जामखेड प्रतिनिधी
स्वतंत्र भारतामध्ये गोरगरीब, वंचित पिडीत, दलितांची इज्जत व सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकरामुळे झाला आहे.निवडणूका झाल्या नसत्या, निवडणूकीला महत्त्व नसते.तुमच्या मताला महत्त्व नसतं, तुम्हांला, आम्हांला राज्यात आणि देशात कोणीच विचारलं नसतं.डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना लिहिली राज्यात, देशात व जगात अशी घटना नाही ,अशी घटना लिहिली. म्हणून आपल्या मताला महत्त्व आहे. लोकप्रतिनिधी ने पाच वर्ष रुबाब केला तर पाच वर्षांनी आपल्या पायापाशी येतो, याला म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना.अंबानी,अदानी कि टाटा असो सर्वांना एकच मत देण्याचा अधिकार आहे.राष्ट्रपतीला एकच मत देण्याचा अधिकार आहे.जो कोणी येडे चाळे करतो निवडून आल्यावर ,त्याला निवडणुकीत आपल्या येथे आल्यावर निटनाटका कसा कार्यक्रम करायचा ते आपण आता या २०२४ च्या निवडणुकीत गरज आहे.

असे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे हे दलित एल्गार मेळाव्यात बोलताना म्हणाले.
दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित दलित एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने प्राध्यापक राम शिंदे यांचे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतीषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले.याप्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष क्षितीज गायकवाड, बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रविण चोरडिया,शहराध्यक्ष पवन राळेभात,मनसे तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले,नगरसेवक दिगंबर चव्हाण, मोहन पवार, गुलशन अंधारे, अमित जाधव,शामीर सय्यद, फिरोज पठाण,बापूसाहेब गायकवाड, राम पवार,दादासाहेब घायतडक,रवि सोनवणे, प्रमोद सदाफुले, फिरोज पठाण,गोरख राजगुरू,सचिन सदाफुले (जाॅकी), किशोर सदाफुले,प्रिन्स सदाफुले,रवि सदाफुले, गणेश घायतडक, बाबासाहेब फुलमाळी,आजिनाथ शिंदे,डॉ सचिन घायतडक, किशोर कांबळे, आकाश साठे,अतिश डाडर,लखन मोरे, नितीन डाडर,अंकल घायतडक,पप्पूराज घायतडक आदी समाज बांधव व माता भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना प्रा शिंदे म्हणाले की,रोहित पवारांनी मी व माझ्या पेहरावकडे न पाहता जनतेचं काय केले आहे ते सांगावे, आता मात्र रोहित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली हे आमच्या शहरातील रेखीला सुध्दा कळलयं,तुमचं आमचं सोडून द्या आता काय होईल.जामखेडचा नाद करायचा नाही.अरे बाबा तु आम्हाला खोटी आश्वासने दिली.कोणाच काय केलं नाही.२५० कोटींची पाइपलाइन तुमच्या डोक्यावर चा हंडा, तुमची पाण्यासाठी वणवण , भटकंती थांबवण्याचं काम या भुमि पुत्राने केलंय.२५० कोटींची पाइपलाइन मंजूर करुन नारळ वाढवून शुभारंभ केला. भारतीय बौद्ध महासभा जामखेड तालुका यांना विचारावे,बुध्द विहार कोणी केले ते जर म्हणाले की,राम शिंदेंनी नाही केले , तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे.खोटं बोलतच नाही, आमच्या बापाने साल घातलेय .कारण गरिबाने खोटं बोललं की, लोक येड्यात काढतेत.शहाण खोटं बोललं की,टायमाला लोक येड्यात काढत्यात.तो टाईम आता आलाय.
लाडक्या बहिण योजनेला रोहित पवार यांचा विरोध आहे. पवार हे इकडे आल्यावर विधानसभा निवडणुकीत फाॅर्म भरतात. हे दुतोंडी मांडूळ आहेत.यावेळी नाव न घेता प्राध्यापक राम शिंदेंनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.ही निवडणूक आपल्या घरच काम आहे,पण आमचा भूमिपुत्र आता पुढच्या दाराने विधानसभेत आमदार पाहिजे,तू ये मागच्या दाराने ,आता आमचा भूमिपुत्र पुढच्या दारानेच विधानसभेत जाणार हा लोकांचा विचार आहे.असे ते यावेळी म्हणाले.
रोहित पवारांना आमदार झाल्यापासून अहंकाराचा आला माज, म्हणून च दलित मेळावा होत आहे – सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले प्राध्यापक राम शिंदे यांनी कर्जत/ जामखेड दोन्ही मतदारसंघांत ज्या दलित वस्त्या आहेत.प्राधान्याने विकास कामाच्या दृष्टीकोनातून पाहिले , आंबेडकर भवन,साठे भवन, संविधान भवन ,बुध्द विहार त्यांच्या विशेष प्रयत्नातून कामे मंजूर आहेत.दोन कोटी रुपयाचे भव्य दिव्य बुध्द विहार होत आहे.याचा सार्थ अभिमान आम्हां भिमसैनिकांना वाटत आहे.जे स्वप्न समाजाचे होते.ते फक्त प्राध्यापक राम शिंदे यांनी साकार केले आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.आम्हांला भेटण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार हे भेटण्यासाठी आले होते.पंरतु जिथे समाजाचा प्रभाव व कल आहे तिकडे आपण आहोत.प्रवाहाच्या विरोधात आम्ही जात नाही,या निवडणुकीत प्रा राम शिंदे यांच्या कडे समाजाचा कौल असून सर्व दलित समाज प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी आहे.फरक आता दिसणार ,प्रा राम शिंदे साहेब च आता जिंकणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवळा गावचे सरपंच सुशीलकुमार आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पाटोदा गरडाचे माजी सरपंच जोगेंद्र थोरात यांनी मानले.
प्राध्यापक राम शिंदेंना विविध पक्ष संघटनेच्या वतीने पाठिंब भटके, विमुक्त व घुमंतू आदिवासी महासंघ
जामखेड येथे झालेल्या एल्गार मेळाव्यात भटके, विमुक्त व घुमंतू आदिवासी महासंघाच्या जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी नगरसेवक मोहन पवार, भागवत सुरवसे उपसरपंच खर्डा, मच्छिंद्र येवले, जामखेड तालुका अध्यक्ष, हनुमंत म्हेत्रे, कर्जत तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार ,जामखेड शहराध्यक्ष, राजेंद्र डोकडे, संजय पिटेकर, सोनू विटकर, गोवर्धन जाधव, अंकुश खाडे, तानाजी खाडे,मोहन खाडे,नितीन धनवडे यांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्यांचे लेखी पत्र देण्यात आले.
रिपब्लिकन सेना, जामखेड तालुका
यावेळी जिल्हा उपमुख्य किरण सदाफुले, सहसचिव मंगेश घोडेस्वार,संघटक कुंदन तुपेरे, सुनील नंदिरे, बबन गव्हाळे, आकाश सदाफुले, तुषार सदाफुले,अविनाश गायकवाड ,सुशांत सदाफुले,मुकिंदा नंदिरे, संतोष क्षिरसागर ,संग्राम नंदिरे,
केतन खवळे, निळकंठ खवळे आदी पाठिंबा दिला.
