Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » जामखेड » Jamkhed| जामखेडमध्ये शिव, फुले, आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यातील मान्यवर नेत्यांची भव्य उपस्थिती
जामखेड

Jamkhed| जामखेडमध्ये शिव, फुले, आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यातील मान्यवर नेत्यांची भव्य उपस्थिती

mahalokwaniBy mahalokwaniApril 15, 2025Updated:April 15, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड शहरात संध्या सोनवणे यांचा प्रेरणादायी सोहळा

जामखेड प्रतिनिधी (धनराज पवार)-


१७ एप्रिलला जामखेडचा Jamkhed इतिहास घडणार आहे. कारण एकाच मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आणि जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या भव्य उपक्रमाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी मांडली असून, गेल्या काही वर्षांपासून हा महोत्सव सामाजिक समतेचा व सांस्कृतिक ऐक्याचा प्रतीक म्हणून राज्यभर गाजतो आहे.

Jamkhed| जामखेडमध्ये शिव, फुले, आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त

या वर्षीचा महोत्सव जामखेड महाविद्यालयाच्या प्रांगणात, १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार असून, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा ‘शिंदे शाही बाणा’ आणि अभिजीत व अमू जाधव यांचा ‘शिवशंभो गर्जना’ प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे आणि अन्य मान्यवरही हजेरी लावणार आहेत.

Table of Contents

  • Jamkhed| जामखेडमध्ये शिव, फुले, आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त

“ही केवळ जयंती नसून, ती एका विचारांची, परिवर्तनाची चळवळ आहे. शिव, फुले, आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच खरा उद्देश आहे,” असं संध्या सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जामखेड तालुका अध्यक्ष महेश निमोणकर हे उपस्थित होते.

जामखेड शहर सध्या उत्साहाच्या भरात आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन,भोजनचा कार्यक्रम संपन्न
Next Article Credit Card | वर लोन मिळवणे झाले सोपे; व्याजदर कमी आणि पैसे लगेच खात्यात
mahalokwani
  • Website

Related Posts

Ram shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

May 5, 2025

पाडळी जि.प.शाळा ( पवारवस्ती) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

April 16, 2025

जामखेडमध्ये आंबेडकर जयंती शिस्तबद्ध आणि शांततेत साजरी करावी – पोलीस निरीक्षकांचा संदेश

April 12, 2025

sharad pawar| शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींचे कौतुक, काय म्हणाले शरद शरद पवार

new mobile| नवीन मोबाइलला घेयाचा पण तुमच्याकडे पैसे नाही ; असा मिळवा नवीन मोबाईल

Sindoor वर शरद पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

Ram shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

hsc result 2025 | राज्यात यंदा बारावीच्या’ निकालाची टक्केवारी घसरली; यांनी मारली बाजी

HSC Result 2025| विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; असा पहा आपला निकाल

rain update | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार ? वाचा भेंडवळच्या मांडणीतील हवामानाचा अंदाज

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.