Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत
ब्रेकींग न्यूज

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

mahalokwaniBy mahalokwaniDecember 17, 2025Updated:December 17, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Bolhegoan दागिन्यांच्या लालसेपोटी एका ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरात घडली आहे. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चौघींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून

नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर या ठिकाणीच्या बोल्हेगाव Bolhegoan येथे राहणाऱ्या मनीषा शिंदे (४०) यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. यानंतर अत्यंत कमी वेळात या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले.

मैत्रिणींसोबत घरात शिरली, काकूंचे दागिने ओरबाडले, आरडाओरड होताच केलं असं काही… परिसरात खळबळ
बोल्हेगाव परिसरात ४० वर्षीय मनीषा शिंदे यांची सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीला अटक करून या प्रकरणाचा छडा लावला. लालसेपोटी हा क्रूर गुन्हा घडल्याचे उघड झाले आहे.

Table of Contents

  • Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून


पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मनीषा शिंदे यांचा खून एखाद्या सराईत गुन्हेगाराने नव्हे, तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या युवतीने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. या खुनाचा मुख्य सूत्रधार दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (२०) ही तरुणी असल्याचे उघड झाले आहे. दिव्याचे माहेर मयत मनीषा शिंदे यांच्या घराशेजारीच आहे. मनीषा शिंदे यांच्याजवळ सोन्याचे दागिने आहेत, याची दिव्याला माहिती होती. याच माहितीच्या आधारे तिने चोरीचा कट रचला.

हा कट रचल्यानंतर दिव्या खाडे हिने तिची साथीदार अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना सोबत घेतले. चोरीच्या उद्देशाने या चौघींनी मनीषा शिंदे यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनीषा शिंदे यांनी जोरदार आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पण आपण पकडले जाऊ या भीतीने या चौघींनी ब्लेडने मनीषा शिंदे यांच्या गळ्यावर वार केले. यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला.

नागरिकांमध्ये मोठी चिंता
मनीषा यांचा खून केल्यानंतर त्यांनी दागिने घेऊन तिथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत या चौघींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दागिन्यांच्या लालसेपोटी मनीषा शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात दिव्या खाडे, अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे. या घटनेमुळे, विशेषतः अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याने, परिसरातील पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी
Next Article mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.