संपादक:- सचिन कांबळे –9604737188
महालोकवाणी न्यूज:-
बोल्हेगाव मधील द्वारका नगरी ही वसाहत नव्याने तयार झालेलि आहे. या द्वारका नगरी अंतर्गत फेज 2 पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकलेलि नव्हती . येथील सर्व महिला दुर अंतरावरून पिण्याचे पाणि आणत होत्या. यामुळे येथील सर्व नागरीक अत्यंत त्रस्त झालेले होते. त्यांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.

या बाबत द्वारका नगरी मधील सर्व नागरीकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांना कळवले ,पिण्याच्या पाण्याची महत्वाची समस्या असल्याने पाणीपुरवठा विभाग मनपा यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून,नागरीकांच्या सहकार्यातुन द्वारका नगरी अंतर्गत फेज 2 पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकुन द्वारका नगरी मधील नागरीकांची कायमची समस्या सोडवलि. या महत्वाच्या कामामुळे द्वारका नगरी मधील नागरीक पांडुरंग थोरवे,प्रविण पोटे,नितीन पोटे,गौतम लिहीणार,भरत पारधे,बाळासाहेब बुद्धिवंत,हर्षद गुंजाळ,योगेश साबळे,सोमनाथ नांगरे,संजय शिरसाठ,संभाजी काळे,अशोक बहिर,काशिनाथ लंगोटे,महादेव भवार,गोरख आजबे,येशुदास पटारे,भगवान भिसे,प्रकाश चांगुणे,कुणाल इंगळे,शुभम ढमके,संतोष म्हस्के,शामवेल बनकर,संदीप कळनर,आंद्रेस लोखंडे व ,सर्व महिला आनंदी व समाधानी झाले.
