Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » 108श्री.महंत पंडित सुच्चासिंगजी माध्यमिक व सबलोक प्राथमिक चे स्नेहसंमेलन संपन्न

108श्री.महंत पंडित सुच्चासिंगजी माध्यमिक व सबलोक प्राथमिक चे स्नेहसंमेलन संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 24, 2023Updated:January 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पालकांचे अनुकरण पाल्य करत असतात, तुम्ही नियम पाळले तर ते देखील पाळतीलच- कु.सुकन्या क्षेत्रे

नगर – सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन श्रमिकांचे भवितव्य बदलून समाज परिवर्तनाचे कार्य सेवा शिक्षण प्रसारक मंडळाने हाती घेऊन शिक्षणाबरोबरच संस्काराची शिदोरी 108श्री. महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालयाच्या व मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये दिल्याचे वार्षिक शैक्षणिक अहवालामधून दिसून आले. पालकांचे अनुकरण पाल्य करत असतात. पाल्यांना तुम्ही नियम पाळताना दिसले तर ते देखील पाळतीलच. तेव्हा टू व्हीलर चालवताना हेल्मेट व फोर व्हीलरमध्ये प्रवास करताना सिटबेल्ट वापरा, असे आवाहन सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक कु. सुकन्या क्षेत्रे यांनी केले.

धनुष्यबाण कुणाचा ? अंतिम निर्णय या दिवशी ..!


नगर येथील दातरंगे मळा येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या 108श्री. महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक व मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून कु.सुकन्या क्षेत्रे, शासकीय तंत्रनिकेतन कार्यशाळा अधिक्षक डॉ.दादासाहेब करंजुले, संस्थेचे विश्वस्थ आर.ए.देशमुख, दादासाहेब भोईटे.रामभाऊ बुचकुल.बाळकृष्ण सिद्दम. रघुनाथ का रमपुरी.प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, सुचित्रा डावरे, प्राचार्य संदिप कांबळे, डॉ.निलेश जाधव, भरत बिडवे, मुख्याध्यापिका सौ.अनिता सिद्दम, सौ.अंजली शिरसाठ, सौ मीरा नराल आदि उपस्थित होते.


कु. सुकन्या क्षेत्रे यांनी भाषण करतांना विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढविण्यासाठी प्रश्न विचारले. वाहतुकीचे नियम, चौकातील सिग्नल बाबत लाल, हिरवा, पिवळा दिव्या चे काम आपण काय बोध घेतो. या सर्वांची समाधानकारक उत्तरे मुलांनी दिले. या संवादातून वाहतुकीचे नियम कसे पाळायचे,आहारातील पॅकींग फूड, फास्टफूडचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सखोल माहिती देऊन मुलांबरोबर उपस्थित पालकांना देखील जनजागृती करून पालकांनी मुलांच्या जडण-घडण या कडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले


अध्यक्षीय भाषणात डॉ.दादासाहेब करंजुले यांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देत त्यांचे चांगले भविष्य घडविण्याचे काम या विद्यालयातून शिक्षक करतात ही बाब अभिनंदनीय आहे. मोबाईलमुळे, पालक व मुलांमध्ये संवाद होत नाही ही खंत व्यक्त करुन पालकांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवून प्रोत्साहन देण्याचे काम करावे. शिक्षक, आई, वडिल यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा असे सांगितले.


प्रास्तविकात मुख्याध्यापिका सौ.अंजली शिरसाठ व सौ.मीरा नराल यांनी शैक्षणिक अहवाल वाचन करुन वर्षभरात विद्यालयाने केलेले उपक्रम, शाळा स्वच्छता मोहिम, योगदिन, एसएससी, स्कॉलरशिप निकालात मिळविलेले सुयश आदिंबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे पदाधिकारी आदिंनी मनोगते व्यक्त करुन बक्षिसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सूत्रसंचालन सौ. विजया नवले यांनी केले तर आभार श्री. बापुसाहेब गायकवाड यांनी मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleछत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकीच्या 37 विद्यार्थ्याची कंपन्यांमध्ये निवड
Next Article पोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी.! अन्यथा पोलिसांवर पण होईल ही कारवाई
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.