गेवराई तालुका प्रतिनिधी:- समाधान सम्राट
प्रतिनिधी :
गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील बाबु (त्रिंबक ) कोकाट यांचा दि. १ फेब्रुवारी बुधवार रोजी गेवराई येथील तालुका कृषि कार्यालय मध्ये कृषि अधिकारी अभय वडकुते यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. सखोल माहिती अशी की ठाकर आडगाव मधील बाबु कोकाट यांनी दोन ते तीन वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
बाबु कोकाट यांनी शेतकरी बांधवांना वेळोवेळी शासकीय योजने बद्दल माहिती दिली तसेच पोखरा योजनेची अंमलबजावणी व त्या मधील योजणे विषयी सर्व माहिती शेतकरी यांना अर्ज करण्यापासून ते शेतकरी यांच्या खात्यात पैसे जमा होई पर्यंत मार्गदर्शन केलं त्या मुळे शेतकरी यांना या योजनेचा फायदा झाला.
पोखरा योजने मधुन बाबु कोकाट यांनी ठाकर आडगाव सह बेलगुलवाडी, कोलतेवाडी, गोळेगाव मधील बऱ्याच शेतकरी यांना फळबाग लागवड, शेततळे, मोटार व पाईपलाइन तसेच शेततळे अस्तरीकरण, तुती शेड ठिबक सिंचन या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावित ,व आकर्षित केले.व बाबु कोकाट यांनी या सत्काराबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवर यांचे खुप -खुप धन्यवाद मानले.
