Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अर्बन बँक कॉलनीत हौशी विठोबा मंदिराचा 26 वा वर्धापन दिन संपन्नभक्त आणि भगवंताच नात अतुट असावं – महेंद्र गंधे

अर्बन बँक कॉलनीत हौशी विठोबा मंदिराचा 26 वा वर्धापन दिन संपन्न
भक्त आणि भगवंताच नात अतुट असावं – महेंद्र गंधे

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 6, 2023Updated:February 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-नगर शहर प्रतिनिधी -विजय मते

नगर – देव हा भक्ताचा भाव पाहून प्रसन्न होत असतो, पंढरीची वारी करणारा वारकरी अंत:करणापासून विठ्ठलाचे नाम घेत चालतो. एखादी वारी जरी चुकली तरी तो वारकरी अस्वस्थ होत असतो. भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारा पांडूरंग हा भक्तांच्या पाठिमागे आहे. अशा या भक्त आणि भगवंताच नात अतुट असावं, असे प्रतिपादन नगर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.
नगर-औरंगाबाद रोडवरील अर्बन बँक कॉलनीमधील हौशी विठोबा मंदिराचा 26 वा वर्धापनदिन मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीची पुजा करुन श्री.गंधे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेविका संगिता खरमाळे, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका ज्योती गाडे, अमोल गाडे, योगीराज गाडे, प्रशांत खांडकेकर, एन.डी.कुलकर्णी, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, आशिष ब्रह्मे आदि मान्यवर उपस्थित होते.


श्री.गंधे पुढे म्हणाले, जोशी परिवाराने मंदिराविषयी व मूर्ती प्रतिष्ठापना बाबत स्वप्नातील दृष्टांत मला कथन केला. तो ऐकल्याने त्यांचे व विठ्ठल-रुख्मिणी बाबत असलेली भक्ती किती अतुट आहे हे समजते. मंदिर बांधण्याचा विठ्ठलाने दिलेला दृष्टांत प्रत्यक्षात अंमलात आणला. या मंदिरामुळे कॉलनीतील भाविकांना दर्शनासह, एकादशी आषाढी वारीला दिंडीतील वारकर्यांची सेवा होत आहे. यामुळे या हौशी विठोबाची ख्याती जिल्ह्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या 26 व्या वर्धापनदिनाला ढवळपुरी (पारनेर) येथील स्वराली जाधव या 8 वी मध्ये शिकत असलेल्या गायिकेने सहकार्यांबरोबर सुंदर भक्तीगीते सादर केली. भाविकांनी तिचे कौतुक केले. कॉलनीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.


आश्विनी अध्यापक यांच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनंत जोशी, प्रविण डोक्रस, धनंजय जोशी, आदिनाथ जोशी, विश्वनाथ जोशी, भार्गव जोशी, संदिप यादव, रुपेश यादव यांनी परिश्रम घेतले. सर्व भाविकांचे अभिजित व प्रज्ञा जोशी दाम्पत्यांनी आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशास्त्रीय व सुगम संगीत आणी बहुजन समाज-डॉ. बाळासाहेब पवार
Next Article पाटोदा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षकांचा सन्मान
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.