Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असताना फरार झालेल्या आरोपीस सिने स्टाईल अटक..!

खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असताना फरार झालेल्या आरोपीस सिने स्टाईल अटक..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार

सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, सन-२०१० विजय गहिनीनाथ चव्हाण रा. सावरगाव ता. जामखेड याने सावरगाव ता. जामखेड येथे एका महिलेचा खुन केलेला आहे. सदर वेळी त्याचे विरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं.२६१/२०१० भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक स्वर्गीय श्री. ज्ञानेश्वर ढोकले व त्यांचे पथकाने करुन आरोपी याचे विरुद्ध मा. न्यायालयात भरभक्कम पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केलेले होते. तद्नंतर सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयात होवुन आरोपी याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने सन २०१२ मध्ये त्यास मा. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. तेव्हा पासुन आरोपी नामे विजय गहिनीनाथ चव्हाण हा शिक्षा भोगत होता.

हे ही वाचा:– Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..


मागील सुमारे ०१ वर्षांपूर्वी बंदी विजय गहिनीनाथ चव्हाण हा विसापुर जिल्हा खुले कारागृह, विसापुर ता.श्रीगोंद येथून फरार झालेला होता. त्या बाबत त्याचे विरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा देखील नोंदविणेत आलेला आहे.
नमुद बंदी हा अधुन मधुन सावरगाव येथे येत असल्याची माहिती मिळालेने मागील सुमारे ०३ महिन्यांपासून पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार पोहेकॉ. संजय लाटे व पो. कॉ. सचिन पिरगळ असे त्याचेवर पाळत ठेवून होते परंतु तो गुंगारा देण्यास यशस्वी
होत होता.

परंतु दिनांक ०४/०२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीचे आधारे पोलीस अंमलदार नामे पोहेकॉ संजय लाटे, पोना. अविनाश ढेरे, पोकॉ. प्रकाश जाधव, पोकों. सचिन पिरगळ व चालक पोहेकॉ. भगवान पालवे यांनी पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत बारकाईने व गोपणीयरीत्या त्याची माहिती काढून, त्याचेवर नजर ठेवुन मोठया शिताफीने सावरगाव ता. जामखेड येथे ताब्यात घेवुन त्यास अटक केलेली आहे. सदरचा बंदी यांस पुनश्च कारागृहात दाखल करणेकामी रवाना करण्यात आलेले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार राम शिंदे यांच्या माध्यमातून होणार कर्जत-जामखेडचा कायापालट नियोजन समितीकडे केली 2 कोटींच्या निधीची मागणी.
Next Article जामखेड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष माननीय विकास (तात्या) राळेभात यांच्या आई कै. रतनबाई भगवंत राळेभात यांचे 12 वे पुण्यस्मरण
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.