महालोकवाणी न्यूज:
प्रतिनिधी :- विजय मते
नगर – राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्यावतीने नाभिक समाजातील विवाहइच्छूक वधू-वर व पालकांसाठी सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी शिर्डी, जि.अहमदनगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली.
हा वधू-वर मेळावा सप्तपदी लॉन, रेल्वे स्टेशनजवळ, शिर्डी, ता.राहता, जि.अहमदनगर येथे सोमवार दि.13 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत होत आहे. या मेळाव्यात वधू-वरांना स्वत: उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.
हे पण वाचा :
Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी !
या मेळाव्यात प्रथम वधू-वर, घटस्फोटीत, दिव्यांग, विधुर, अंध आदिही सहभागी होणार आहेत. नोंदणी झालेल्यांना प्रवेशिका, माहिती पुस्तिकासह, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या मेळाव्यास मोठ्या संख्येने वधू-वर व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष व आयोजक मनोज वाघ, सुनिल गायकवाड, संजय जायभाय, दशरथ तुपे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.9226373999 या क्रमांकावर संपर्क साधावा.
