Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बारा बलुतेदार महासंघातील कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्याने संघटनावाढीसाठी पाठबळ मिळेल -ज्ञानेश्वर कविटकर

बारा बलुतेदार महासंघातील कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्याने संघटनावाढीसाठी पाठबळ मिळेल -ज्ञानेश्वर कविटकर

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 10, 2023Updated:February 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

नगर – कोणत्याही क्षेत्रात काम करतांना कार्यकर्त्यांची ताकद पाठीशी पाहिजे. नगर जिल्ह्यात बारा बलुतेदार महासंघ स्थापन झाल्यापासून यामध्ये कार्यकर्ते एकानिष्ठ राहुन काम करतात त्यामुळे विविध प्रश्न सुटत आहे. हेच कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्याने माझी जिल्हा संघटक पदी झालेली निवड संघटनवाढी विषयी मला पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर कविटकर यांनी केले.

हे नक्की वाचा Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी !


नगर शहरातील आगरकर मळा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कविटकर यांची ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अनिल इवळे, सचिव शाम औटी, सहसचिव श्रीकांत मांढरे, महिला शहराध्यक्ष रोहिणी बनकर, मच्छिंद्र बनकर, भाऊसाहेब कोल्हे, बाळासाहेब इवळे, राजू ढवण, जालिंदर बोरुडे, मल्हारी गीते, सागर नांदुरकर, संदिप घुले, आदिनाथ गायकवाड, अजय अकलुजकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.


श्री.कविटकर पुढे म्हणाले, बारा बलुतेदार महासंघात सर्व समाजातील कार्यकर्ते कार्यरत आहे. प्रत्येक समाजातील प्रश्न अडचणी सोडविण्याची जबाबदारी सर्वांची आहे हे लक्षात घेऊन सर्वजण काम करतात. मला दिलेली जबाबदारी मी यशस्वी पार पाडीन. त्यासाठी कार्यकर्ते मला पाठबळ देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात आपल्या ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या शाखा आहेत. कार्यकर्ते हीच आपली ताकद आहे. प्रत्येकाने आपल्या कामातून आपली चांगली ओळख निर्माण करुन संघटना वाढवावी, असे मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
शेवटी अनिल इवळे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महासंघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसोमवारी शिर्डीत नाभिक समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर, पालक मेळाव्याचे आयोजन – बाळासाहेब भुजबळ
Next Article जामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार- शेतकरी हैरान
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.