जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
जामखेड शहरातील ल.ना. होशिंग विद्यालय येथे वार्षिक पारितोषीक वितरण पार पडले. आज रोजी ल.ना.होशिंग विद्यालय येथे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात या विद्यालयातून यश किशोर पवार हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता. तो एन. एम.एम. एस. परीक्षेत categery तून त्याने हे यश संपादन केले आहे.त्याबद्दल आज उपप्राचार्य पोपट जरे सर यांचे हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सैफुल्ला खान, संस्थेचे संचालक अशोक शिंगवी, प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपमुख्याध्यापक रमेश आडसुळ सर,माजी प्राचार्य अनंता खेत्रे सर, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे सर आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल युवा नेते राम पवार, बाळासाहेब कदम,संतोष पिंपळे
विजय कुलकर्णी ,संतोष गर्जे,हर्षल पवार आदींसह सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यश किशोर पवार हा विद्यार्थी इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत आहे. तो एक वंचित घटका मधला असून तो
( आदिवासी पारधी) या समाजाचा आहे.माणुस हा परिस्थिती व संघर्षातून घडत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे यश पवार

आदिवासी पारधी समाजासाठी सरकारने कागदोपत्री बऱ्याच योजना राबवल्या जाऊनही समाजाने या व्यवस्थेने त्यांना मुख्य प्रवाहा पासून दूर ठेवले आहे, सामावून घेतले नाही. बहुसंख्य पारधी समाज भटका असल्यामुळे मतदार यादीतील नोंदणी, रेशनकार्ड आणि त्यापरत्वे मिळणाऱ्या शासकीय सुविधंपासून आणि शिक्षणापासून वंचित राहात आला आहे.
पण आज पण ते या व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन आपले शिक्षण पूर्ण करीत आहे यातच जामखेड येथील पारधी समाजाच्या या विद्यार्थ्यांनी समाजाला हे दाखवून दिले की आमच्या आ अंगी सुद्धा कौशल्य आहे परंतु आमच्या काही मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याने आम्ही शिक्षणापासून वंचित राहत आहोत माझे खूप मोठे स्वप्न आहेत व ते मी पूर्ण करणार व या भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असा निर्धार या मुलाने यावेळी व्यक्त केला आहे
