महालोकवाणी न्यूज:
पुणे जिल्हा प्रतिनिधी :बबनराव धायतोंडे
सालाबादप्रमाणे खानवटे तालुका दौंड (Daund) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते…आज शेवटच्या दिवशी काल्याचे सांगता किर्तन ह.भ.प. शिवचंद्र महाराज शेळके (आळंदी) यांचे झाले या किर्तनासाठी महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सप्ताहाचे दरम्यान 7 दिवस दररोज संध्याकाळी किर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले

सप्ताहाचे नियोजन यावर्षी प्रथमच तरूणांनी हातात घेतल्याने ग्रामस्थांनी त्यांना आर्थिक मोठा प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पा घाडगे. रंगनाथ ढवळे. शरद नवले. बाळासाहेब गावडे. सुनिल शिरसट. सोमनाथ सावंत. कन्हेरकर यांनी विशेष योगदान दिले. व त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच अर्जुन शिरसट व

विकास सोसायटीचे माजी चेअरमन संभाजी ढवळे.सामाजिक कार्यकर्ते भिमराव पवार.ईत्यादी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते .या ठिकाणी काल्याच्या महाप्रसादाचा आस्वाद सर्व ग्रामस्थांनी घेतला आणि साप्ताहाची सांगता झाली….
