महालोकवाणी न्यूज:
जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मा. आ. रोहित (दादा) पवार यांच्या संकल्पनेतून मंगेश (दादा) आजबे शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड व रोहित (दादा) पवार मित्र मंडळ कर्जत/ जामखेड आयोजित भव्य कुस्तीचे जंगी मैदान.

भव्य अशा कुस्ती स्पर्धेत भारत विरूध्द इराण म्हणजेच यामध्ये भारताचा पै.महेंद्र गायकवाड ( पुणे,उपमहाराष्ट्र केसरी) विरूध्द इराणचा पै.उसेन इराणी ( इंटरनँशनल पैलवान इराण) , पै. गणेश जगताप ( पुणे ,महापौर केसरी) विरूध्द पै. विजय सोनिपत ( हरियाणा- हिंद केसरी) ,पै. दादू मुलाणी ( शिवराय कुस्ती संकुल , कुर्डूवाडी) विरुद्ध पै.सुहास गोडगे ( आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुल,पुणे) , पै. बाप्पू जरे ( शंभुराजे कुस्ती संकुल,जामखेड) विरुद्ध पै.मोईन अली ( वाडीया पार्क तालीम, अहमदनगर) अशा अनेक दिग्गज पैलवानांच्या कुस्त्या जामखेडकरांना पाहावयास मिळणार आहे.
भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे उद् घाटन शंभुराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे यांचा पट्ठा पै. सुरज आजबे विरूध्द पै. वसंत रसाळ, दिघोळ यांचा पट्ठा पै.पांडूरंग राजगुरू यांच्या कुस्तीने होणार आहे.

या कार्यक्रमास कर्जत / जामखेड चे लोकप्रिय मा. आ. रोहित (दादा) पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जामखेड आणि जामखेड पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमींना कळवण्यात येते की येत्या 19 फेब्रुवारीला कुस्ती शौकीनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन यावेळी शंभुराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक मंगेश कन्स्ट्रक्शन आँफीस ते श्री नागेश विद्यालय मिरवणुक निघेल.
वार -रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता स्थळ :- श्री नागेश विद्यालय ,जामखेड
संपर्कासाठी पै.बालाजी जरे 8830793500,पै.श्रीधर मुळे 7020681910, पै.सचिन दाताळ 7498278302
