पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे.
कात्रज तालुका करमाळा येथे भिमा ( Bhima) नदीचे किनारी पुरातन काळातील दगडी हेमाडपंथी निळकंठेश्वशराचे मंदिर असून येथे दर्शनासाठी महिला भगिनींनी चक्क चार किलो मिटर पाण्यातून होडीने जाऊन घेतले दर्शन या मंदिरात भगवान शंकर महादेव यांचे पदस्पर्शाने हि भूमी पावन झालेली आहे.

पुर्वी येथे पिंपळाचे झाड होते याच झाडाचे पान तोडले की त्याचे सोने होत होते असे जुनी लोक सांगत होती असे सरपंच हंडाळ यांनी सांगितले. येथे चिलीया बाळाची कथा घडली होती म्हणून या मंदिरा ला अनन्य साधारण महत्त्व आहे. व येथे चिलीया बाळाची मुर्ती देखील आहे. या गावातुन जुनी रेल्वे देखील जात होती या ठिकाणी रेल्वे स्टेशन झाल्यावर या गावाचे जुने नाव कांचनपूर होते ते बदलून कात्रज ठेवण्यात आले.

भाविकांना महाप्रसाद म्हणून शाबू खिचडी दिवसभरात ऐक हजार किलो लागते . या महाप्रसादाची गेली अनेक वर्षाची परंपरा चालू आहे. या मंदिर परीसराला भव्य असे यात्रेचे स्वरूप आले होते. मंदिर परीसरात सर्व नियोजन अदिनाथ साखर कारखान्याचे संचालक किरण काका कवडे, करमाळा पंचायत समितीचे सदस्य नागनाथ लकडे, कात्रजचे सरपंच मनोहर हंडाळ, मच्छिंद्र लकडे, लतिश पाटील, माजी सरपंच दत्तात्रय धायगुडे, शंकर माने. इत्यादींनी केले होते..
