महालोकवाणी न्यूज:
गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथील एक हुशार,कवी,लेखक, वात्रटिकाकार मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व ज्यांना आतापर्यंत अखिल भारतीय पत्रकार आणि पत्रलेखक संघ राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार २०२१ मिळालेला आहे व राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा प्रथम पुरस्कार विजेते २०२२ पुरस्कार मिळालेला आहे श्री समाधान हनुमान सम्राट जे की लहानपणापासून लिहीण्याची,वाचण्याची सवय आहे विविध विषयांवर लिखण करणे कायम चालू असते

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथील युवक श्री समाधान हनुमान सम्राट हे गेल्या अनेक वर्षांपासून लिखाण करत आहेत त्यांनी आतापर्यंत शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, शिक्षण क्षेत्र, मित्र,बाप,पाऊस, सोयाबिन,कापुस, ऊसतोडी, समाजसेवक अशा अनेक बाबींवर कवीता केली आणी यांचीच एक कविता ती म्हणजे:- शेतकऱ्यांचा राजा..हि कविता मा श्री नरेंद्र लांजेवार सर स्मृती इ कवीता संग्रह यांच्या मैत्री प्रकाशन बुलढाणा येथील आदरणीय संदीप राऊत यांनी माझी कविता प्रकाशित केली आणि या सर्व गोष्टी माझ्या कवितेवरती,लिखाणावरती प्रेम करणाऱ्या वाचकांचे आशिर्वाद आहेत आणि यांचे श्रेय लहान मोठ्या ज्येष्ठ वाचकांना समर्पित आहे या माध्यमातून साहित्य विश्वात सक्रिय लोकांशी संपर्क आला नव्या विचारांची देवाणघेवाण करता आली अशी संधी दिल्याबद्दल संपादक मंडळ व निवड समिती आणि मार्गदर्शकाचे आभार..