महालोकवाणी न्यूज
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
Pune शिक्षण विभागासारख्या पवित्र विभागात भ्रष्ट अधिकारी काम करत असतील तर संपूर्ण आयुष्य मुले.मुली शिक्षण देऊन भावी पिढी घडविणाऱ्या त्यांच्याच खात्यातील सहकारी लाचेची मागणी करत असतील तर त्यांच्या मनातील वेदनांचा विचार न केलेलाच बरा , शिक्षण विभाग पुणे येथील 1) प्रमिला प्रभाकरराव गिरी वरीष्ठ लेखाधिकारी वर्ग. 2 (2) अनिल श्रीधर लोंढे.कनिष्ठ लेखाधिकारी शिक्षण विभाग कार्यालय सिनेगाँक स्ट्रिट पुणे .यांना दिनांक. 08.व 13 आणि 20 रोजी सदरच्या प्रकाराची पडताळणी करून दिनांक 20 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक . विजयमाला पवार यांनी सापळा लावून 5000 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.या घटनेने जिल्ह्यातील शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या घटनेतील तक्रारदार हा शिक्षक असून त्याचे सेवा पुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानूसार वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी लोकसेवक प्रमिला गिरी यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती त्या प्रमाणे गिरी यांनी 6000 रूपये ची मागणी संबधित शिक्षकाकडे केली होती त्यातील 5000 रुपये गिरी यांचे वतीने अनिल लोंढे कनिष्ठ लेखाधिकारी यांनी स्विकारली असल्यामुळे दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे व लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील अनिल श्रीधर लोंढे हा मुळचा डिकसळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे( Pune) येथील रहिवासी असून त्याने अशाच प्रकारे करोडो रुपयांची मालमत्ता कमवली आहे व नातेवाईकांचे नावावर केली आहे अशी डिकसळ येथे जोरात चर्चा चालू आहे..याच्या मालमत्तेची चौकशी केल्यास फार मोठे घबाड मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या बाबत आमचे पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी .पोलीस उप अधिक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधला आसता त्या म्हणाल्या कि त्यांना कोर्टात हजर केले असता दिनांक 23 पर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळाली आहे . व पुढील तपास सुरु आहे…
