Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ‘शिवजयंती’ समानतेचा व एकतेचा संदेश देणारा उत्सव; आ. रोहीत पवार यांनी ढोल वाजवून कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह !

‘शिवजयंती’ समानतेचा व एकतेचा संदेश देणारा उत्सव; आ. रोहीत पवार यांनी ढोल वाजवून कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 21, 2023Updated:February 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सोमवारी सर्व जातीधर्माच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथून छञपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांला हत्तीवर बसवून व दुसऱ्या रथात छत्रपतींचा पुतळा बसवून बीड रस्ता, छत्रपती शिवाजी पेठ मार्गात मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली नंतर करमाळा खर्डा चौफुला येथे मिरवणूक विसर्जन करण्यात आली. या मिरवणुकीत आ. रोहीत पवार यांनी ढोल वाजवून नागरिकांचे लक्ष केंद्रित केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व जातीधर्माच्या वतीने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मिरवणूकीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती येथून करण्यात आले होते. या मिरवणुकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी असलेल्या उज्जैन येथून आलेला हत्ती अहिल्यादेवींच्या जन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आला होता हा योगायोग होता. मिरवणूकीत सर्व जातीधर्माच्या नागरिका बरोबरच वारकरी संप्रदाय सहभागी झाला होता. त्यामुळे या मिरवणुकीला राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दिसून आले. झांज पथक, ढोल-ताशा, लेझीम पथक, व टाळ पथकाने मिरवणूकीने लक्ष वेधले होते.


आ. रोहीत पवार यांनी या मिरवणुकीत ढोल वाजवून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कर्मभूमीतून गजराज हे अहिल्यादेवींच्या जन्मभूमीत आले हा योगायोग आहे. अशाच प्रकारची मिरवणूक कर्जत, मिरजगाव, खर्डा व जामखेड येथे झाली असून राशीन येथे मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीत नागरिकांनी पुष्पवृष्टी केली तसेच व्यापारी बांधवाकडून पाणी, दही व मुस्लिम बांधवांनी केळी वाटप केले. वारकरी संप्रदायातील लोक मोठ्या संख्येने होते.तसेच शिवजयंती हा समानतेचा व एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे.


याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात ,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, सरचिटणीस राजेंद्र पवार, जिल्हा मजूर फेडरेशन चे संचालक प्रकाश सदाफुले, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, सुर्यकांत मोरे,उमरभाई कुरेशी, प्रकाश काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात, प्राचार्य विकी घायतडक,नगरसेवक दिगांबर चव्हाण,मोहन पवार, अमित जाधव,चेअरमन सुंदरदास बिरंगळ,पवन राळेभात, युवा नेते महेंद्र राळेभात, प्रविण उगले, महेश राळेभात, अँड हर्षल डोके, सरपंच नरेंद्र जाधव,बापुसाहेब कार्ले,काकासाहेब राळेभात, प्रसन्न कात्रजकर, नागेश कात्रजकर,केमिस्ट असोशिएनचे अध्यक्ष तात्या बांदल, हरिभाऊ आजबे , डॉ. चंद्रशेखर नरसाळे ,सचिन शिंदे, वसीम सय्यद ,अमोल लोहकरे,गणेश हगवणे, इमरान तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleविराट कोहलीला एका ‘मिस्ट्री गर्ल’ ने सगळ्यांसमोर केलं किस; व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल !
Next Article स्व एम ई भोरे ज्यु काँलेज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.