Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Madhi|मढीत नाथांचा जयघोष.. होळी पेटवून धार्मिक उत्सवास सुरवात

Madhi|मढीत नाथांचा जयघोष.. होळी पेटवून धार्मिक उत्सवास सुरवात

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पाथर्डी प्रतिनिधी: सोमराज बडे

:श्री क्षेत्र मढी ( ता. पाथर्डी,जि.नगर ) येथे नगरा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या नाम जयघोषात आज (ता.२१)रोजी गडावर मानाची होळी पेटविण्यात आली. होळी सणाच्या पंधरा दिवस अगोदर होळी ( भट्टीचा सण ) साजरी होणारे मढी हे देशातले एकमेव गाव आहे. यावेळी राज्याच्या विविध भागातल्या काना कोपर्यातून आलेले हजारो नाथभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

नाथांची आरती झाल्यानंतर पवित्रहोळीची पुजा करून मढी ( madhi) देवस्थान अध्यक्ष बबनराव मरकड आणि पुजारी यांच्या हस्ते रात्री नऊ वाजल्यानंतर होळी पेटविण्यात आली. यावेळी सरपंच संजय मरकड, देवस्थानचे सचिव विमलताई मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, डॉ. विलास मढीकर शामराव मरकड, भगवान मरकड, नवनाथ मरकड, बी. जे मरकड, एकनाथ मरकड, भानुविलास मरकड आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळपासूनच गडावर नाथभक्तांची मोठी वर्दळ होती. मोठ्या संख्येने लागणाऱ्या गोवऱ्या दहा दिवस आधीच श्रीकानिफनाथांचे नाव घेत सर्व जाती धर्माच्या महिलांनी घरो- घरी तयार केलेल्या असतात. गोवऱ्या गावांतून वाजतगाजत गडावर सूर्यास्तापूर्वी आणत भट्टी रचण्यात आली.
साधारण पन्नास बाय पन्नास अंतरावर दहा फूट उंच अशी भट्टी रचण्यात आली होती. गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळी नैवेद्य ग्रामस्थांकडून ठेवण्यात आला. होळी भोवती आकर्षक रांगोळी व फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. सर्व समाजातील ग्रामस्थांना होळी रचण्याचा मान असून, नैवेद्यासाठी देवस्थान समितीकडून डाळ व गूळ देण्यात आला होता. भट्टी पेटल्यानंतर नाथांचा जयघोष करत भाविकांनी भट्टीमध्ये श्रीफळ अर्पण केले.

मढी येथील होळीच्या सणाला शेकडो वर्षांची परंपरा असून, नाथांनी समाधी घेतल्यानंतर मढी गावात या सणाला सुरुवात झाली. मढी येथील यात्रा फाल्गुन पौर्णिमेपासून ते चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापर्यंत चालते. राज्यातील अठरापगड जातीचे मानकरी व भाविक येण्यास हळूहळू सुरवात होते. मढी येथील सर्व अठरा पगड जाती धर्मांचे ग्रामस्थ शेतीवाडी,करून यात्रेसाठी सज्ज राहतात. तब्बल महिनाभर श्रीक्षेत्रमढी येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेत हा यात्रोत्सव चालू असतो.

होळीसाठी लाकडाचा वापर नाही-
होळीत लाकूड वापरले जात नाही. शुद्ध तूप, कापूर, सुगंधी वनस्पती आणि मुख्य म्हणजे शेणाच्या गोव-या आदींच्या साहाय्याने होळी प्रज्ज्वलित केली जाते. वृक्षतोड होऊ नये, पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी होळीला शेणाच्या गोवऱ्या थापून त्याला धार्मिक महत्त्व देत हा उत्सव साजरा केला जातो.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डीमध्ये आमरण उपोषण; खोलेश्वर तिर्थक्षेत्र आणि रस्त्यालगत गटार बांधकामाच्या चौकशीसाठी केलं उपोषण !
Next Article राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो-राहुल नंदकुमार झावरे पाटील
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.