महालोकवाणी न्यूज:-
कृत्रिम व आभासी जीवन जगणाऱ्या युवा पिढीला श्रम संस्काराचे महत्व करण्यासाठी राष्ट्रीय योजनाचे सेवा योजना चे शिबिर महत्वाचे असणार आहे. याबरोबरच युवांना श्रमाचे महत्व व त्या माध्यमातून मिळणारी प्रतिष्ठा ही तितकीच महत्त्वाचे असून आपणास शारीरिक श्रम करून काम करणारा की मोबाईल घेऊन फिरणारा, डोके घालणारा साथीदार हवा याच्याही सामाजिक भान विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आव्हान पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती माननीय राहुल नंदकुमार झावरे पाटील यांनी वडगाव अमली येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन समारंभात केले.
यावेळी , सौ राणीताई लंके जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर , श्री श्रीकांत चौरे नगरसेवक पारनेर नगरपंचायत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय आर खर्डे , श्री राधाकृष्ण पवार अध्यक्ष तंटामुक्ती, सौ मंगल ठाणगे वडगाव आमली, श्री अमोल पवार सरपंच वडगाव अमली , श्री राजेंद्र गायकवाड उद्योजक , श्री शशांक पवार सेवा सोसायटी सदस्य , श्री शशांक ढेरे उद्योजक उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री राहुल झावरे पाटील म्हणाले ,प्रत्येकाला स्वतःबद्दल तसेच स्वतःच्या क्षमतेबद्दल जाणीव होण्याकरता अशा प्रकारचे श्रमसंस्कार शिबिर अत्यावश्यक असून विद्यार्थी तथा विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी अतिशय जोरकसपणे भाग घ्यावा व ह्या या श्रम शिबिरामध्ये आपण काय मिळवलं याबद्दलही होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना सौ राणीताई लंके म्हणाले की श्रमाचे महत्व प्रत्येकाला माहित गरजेचे असून आपल्याला आपल्या महाविद्यालया अंतर्गत ही संधी जर भेटत असेल तर त्यामध्ये सर्व विद्यार्थी तथा विद्यार्थिनींनी स्वयंपूर्ण सहभाग नोंदवून वडगाव अमली चा कायापालट करण्यात आपला सहभाग नोंदवा असे आव्हान त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित या सात दिवसीय श्रमसंस्कार निमित्त आयोजित विविध कार्यक्रमाबद्दल माहिती देताना स्वयंसेवकांनी साचेबद्ध काम करून छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालय व वडगाव आमली ग्रामपंचायतला अभिपानस्पद वाटेल असे काम करावे असे आव्हान केले. या शिबिरातन संस्कार श्रमसंस्कार होणारच आहे परंतु त्याबरोबरच अधिकाधिक लोकप्रबोधन व लोकसहभाग याबद्दलही कार्यक्रम अधिकारी व लक्ष द्यावे असे आव्हान केले.
का राबविले जातात हे शिबिर ?
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवा करणे आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजून घेऊन रचनात्मक कार्य करणे समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा स्वावलंबन चारित्र्यसंवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पद्धतीत घडून आणण्यासाठी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा
मंत्रालय अंतर्गत राबविण्यात येते’
जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांचा सहभाग
छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील 50 50 विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वयंपूर्ण गतवर्षी व यावर्षी सामाजिक विषयावरती जनजागृती करण्याकरिता भर दिला असून ग्रामीण भागातील रहिवाशांना मनोरंजनात्मक कार्यक्रमातून प्रबोधन करण्यास महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी निश्चित केले आहे.
कुठल्या वेळेत काय करायचे इच्छुक नियोजन कार्यक्रम आधिकारी करतात यामध्ये योगासने प्राणायाम व्यायाम मानसिक आरोग्य सामाजिक कार्य राष्ट्रीय एकात्मता जलव्यवस्थापन शासकीय योजनांची माहिती सामाजिक जनजागृती बरोबर श्रमदानाचा समावेश आहे तसेच या योजनेअंतर्गत स्वयंसेवक विद्यार्थी ग्रामीण समस्या जाणून घेतात हे स्वयंसेवक लोकसहभागातून या समस्यांचे निरसन करण्याचे प्रयत्न करतात त्यामुळे संबंधित गावाच्या वैभवात नक्कीच भर पडते.
