महालोकवाणी न्यूज:
दिल्लीतील (Delhi) दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 8 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून (CBI) त्यांना आता सोमवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीबीआयने रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते आणि त्याचवेळी त्यांना अटक होण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. सिसोदिया यांना अटक करण्यात आली.

आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया (manis Sisodiya) हे दोन नंबरचे नेते आहेत.पक्षाची रणनीतीकारांपैकीही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्ली सरकारमधील ते दोन नंबरचे सर्वात शक्तिशाली नेते होते.
सिसोदिया यांच्या अटकेमुळे आम आदमी पार्टीपासून सरकारच्याही अडचणी वाढल्या आहेत. मंत्री सत्येंद्र जैन हेही आधीच तुरुंगात गेल्याने अरविंद केजरीवाल यांच्यासमोरील राजकीय आव्हाने वाढली आहेत.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारच्या सुमारे 18 मंत्रालयांची जबाबदारी आहे, ज्यामध्ये शिक्षण, नियोजन, रोजगार, सार्वजनिक बांधकाम (PWD), पर्यटन, उद्योग, वीज, शहरी विकास, पाणी यासारख्या खात्यांचा समावेश आहे

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind kejriwal) यांनी कोणतेही खाते स्वत:कडे ठेवलेले नाही. मनीष सिसोदिया हेच दिल्ली सरकारच्या सर्व कामकाजाची जबाबदारीही सांभाळत होते. त्यांच्या अटकेनंतर केजरीवाल सरकारच्या विकासकामांवर परिणाम होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
