जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार

जामखेड शहरातील ल.ना.होशिंग विद्यालय येथे आज रोजी ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा ठेवा पुढील पिढीला माहिती होण्याकरिता प्राचार्य श्रीकांत होशिंग सर यांच्या संकल्पनेतून यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये लोकगीते, संत साहित्य , देवीची गीते, भारूड, गौळण, वासुदेव, शेतकरी गीत, पोवाडा इ. पारंपरिक लोकगीते विद्यार्थ्यांनी सादर केली.

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे, माजी उपमुख्याध्यापक चांदेकर सर आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल देडे सर ,कुलकर्णी सर , साईप्रसाद भोसले सर, सदाफुले सर,श्रीमती संगीता दराडे मॅडम,श्रीमती सुप्रिया घायतडक मॅडम, श्रीमती पूजा भालेराव मॅडम, श्रीमती रेश्मा कारंडे मॅडम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पोषाख परिधान केले होते तसेच शहरातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली.
