महालोकवाणी न्यूज
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची पारनेर येथे नुकतीच बदली झाल्याने आज रोजी जामखेड पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सत्कार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासमोर जामखेड मधील वाढते गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत , संभाजी गायकवाड साहेबांनी जामखेडची कायदा व सुव्यवस्था अतिशय छान पद्धतीने हाताळली आहे . सर्व समाज घटकांना समान न्याय दिला आहे त्यामुळेच गायकवाड साहेबांना जामखेडकरांनी खूप सन्मान दिला होता

जामखेड कर्जत या मतदारसंघात दोन आमदार आहेत दोन्ही आमदार वेगवेगळ्या पक्षाचे आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी कार्य करत असताना बऱ्याच अडचणी येऊ शकतात तसे जामखेड मध्ये बरेच अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत त्यांना पण आळा घालण्याचे मोठे आव्हान महेश पाटील यांच्यासमोर असणार आहे पण त्यांचा माघील कामाचा अनुभव पाहत महेश पाटील हे सर्व कार्य व्यवस्थित हाताळतील व जामखेडकरांना गुंडगिरी अवैध धंदे यांच्यापासून मुक्त करतील असा विश्वास सामान्य जनता महेश पाटील यांच्याकडून करीत आहे
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोसई अनिल भारती तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
