Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » चिंचपुर पांगुळ मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपासुन पहिल्यांदाच भरला बाल आनंद बाजार

चिंचपुर पांगुळ मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपासुन पहिल्यांदाच भरला बाल आनंद बाजार

mahalokwaniBy mahalokwaniMarch 4, 2023Updated:March 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:

पाथर्डी तालुक्यातील पूर्वेेकडील शेवटचे टोक असलेल्या चिंचपुर पांगुळ मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपासुन पहिल्यांदाच बाल आनंद बाजार भरला असून मुलांना शालेय ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञान समजावे,त्याचे प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(१ली ते ४थी) चिंचपूर पांगुळ येथे आज (ता.४)शनिवार रोजी बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. अहंमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच या परिसरात बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता.

बाल आनंद बाजाराच्या माध्यमातून मुलांमध्ये शालेय ज्ञानासोबत व्यवहार ज्ञानाचे आकलन व्हावे,नफ-तोटा समजावा हा यामागचा उद्देश असल्याचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, चहा,नास्ता तसेच सर्वप्रकारचा सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होता. गावातील ग्रामस्थ व परिसरातील लोकांनी या बाजारात हजेरी लावून मोठ्याप्रमाणात खरेदी देखील केली. सुमारे पाच हजार रुपयांपर्यंतची या बाजारात उलाढाल झाली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सापते यांनी सांगितले. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. असे मत मुख्याध्यापक संतोष रामनाथ सापते यांनी व्यक्त केले.

चिंचपूर पांगुळ गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल आनंद बाजार भरल्याने या बाजारात लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ग्रा.प.सदस्य विष्णू खाडे व पत्रकार सोमराज बडे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करुन बाल आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आनंद रधवे,सोमराज बडे,भागीनाथ बडे यांची भाषणे झाली. याप्रसंगीे,डॉ बांगर,रघुनाथ बडे, सूर्यभान साखरे,दीपक साखरे,कालिदास राजगुरू,बंडू बडे,विलास राजगुरू,पंढरीनाथ साळुंके,भगवान रंधवे,रवींद्र साळवे,दादा राजगुरू,नितीन साळवे,उद्धव राजगुरू,योगेश साळवे,शेषराव आंबिलढगे,कृष्णा रंधवे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भागीनाथ बडे,प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू खाडे हे होते.सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक संतोष सापते यांनी केले. तर आभार शाळेच्या शिक्षिका अलका दुसंग मॅडम यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील रूजू
Next Article घरकुल योजना अभियानात जामखेड प्रथम क्रमांकावर तर कर्जत तिसऱ्या स्थानी सर्वाधिक उद्दिष्ट्य पूर्ण |आमदार.रोहित पवार यांच्या नियोजनला यश
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.