सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी
कांदा , कापूस , वीज तोडणे , सिलेंडर दरवाढ आदी विरोधात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी (pathrdi) येथील प्रांताधिकारी कार्यालयाला कापसाचे व कांद्याचे तोरण बांधून कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सरकार विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी गळ्यात कांदा व कापसाच्या माळा घातल्या होत्या.यामुळे सुमारे एक ते दीड तास दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती . यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आक्रोश केला.

अतिवृष्टीचे मागील वर्षी चे राहिलेले गावातील तसेच यावर्षीचे थकीत अनुदान त्याचप्रमाणे कांदा,ऊस,तूर,कापूस,सह विविध पिकांना हमीभाव द्यावा , शेतकऱ्यांचे शेती पपंचे वीज कनेक्शन कट करू नये , गॅस सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात या मागण्या करण्यात आल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे , माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बापू बोरुडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाअध्यक्ष उद्धव केदार, नितीन बारगजे,डॉ राजेंद्र खेडकर,डॉ.अशोक बडे,शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे ,काँग्रेस तालुकाध्यक्ष नाशिर शेख अनिल ढाकणे,राजेंद्र बोरुडे,देवा पवार,वैभव दहिफळे बाळासाहेब दराडे,गणेश वायकर,महादेव दहिफळे,अनिल बंड , पप्पू शिरसाट,आरती निराळी,माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले आदीसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार श्याम वाडकर यांनी सदर मागण्याबाबत सकारात्मक विचार करून त्या शासन दरबारी मांडण्यात येतील , असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांयदे , पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर व सहकारी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला .
