विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रताप ढाकणे यांच्या संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलतांना केले.
महालोकवाणी न्यूज
पाथर्डी प्रतिनिधी सोमराज बडे
विरोधी पक्षनेते अजित पवार हे प्रताप ढाकणे यांच्या संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी पाथर्डी (pathrdi) येथे आले, होते यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधताना माननीय अजित पवार बोलत होते यावेळी अनेक नेते या मंचावर उपस्थित होते प्रचंड असा जनसमुदाय जमला होता, यावेळी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना हात घातला,

पाथर्डी शहराच्या पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर २०२२ मध्ये आमच्या सरकारने मजुरी दिली.तसेच भगवानगड व ४६ गांवे पाणीपुरवठा योजना तांत्रिक मंजुरीस आम्हीच मान्यता दिली. परंतु काही लोक ती आम्हीच योजना सुरू केली असे सांगत जंरलतेची दिशाभूल करत आहेत पाथर्डी शहरात तर वेगळीच भानगड आहे ,नदीपात्रात गटार केली आहे
याला जबाबदार कोण आहे तर तुम्ही मतदार कारण तुम्ही भावनिक होऊन मतदान करतात त्यामुळेच हा मतदार संघ मागास आहे असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रताप ढाकणे यांच्या संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलतांना केले.

यावेळी व्यसपीठावर सुषमा अंधारे, प्रतापकाका ढाकणे,बाळासाहेब हराळ, घनश्याम शेलार,मा आ चंद्रशेखर घुले,मा.आ नरेंद्र घुले,उद्धव ठाकरे सेनेचे ता अध्यक्ष भगवान दराडे,बाळासाहेब नहाटा,विनायक देशमुख,गहीनाथ शिरसाठ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष शिवशंकर राजळे,शशिकांत गाडे,शुभांगी पाटील,प्रतिभाताई ढाकणे,योगिता राजळे,ऋषिकेश ढाकणे,सिद्देश ढाकणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक ता.उपाध्यक्ष उद्धव केदार,नितीन बारगजे, यांसह शेवगाव-पाथर्डीतील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्तीत होते.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक प्रताप काका ढाकणे,सुषमा अंधारे,आ.निलेश लंके,मा आ चंद्रशेखर घुले,मा विनायक देशमुख यांची भाषणे झाली.
यावेळी पुढे बोलतांना पवार म्हणाले की,काही लोक साखर कारखाना वर चिट बॉय म्हणून काम करत होते.काही ड्रायव्हर होते, अश्या लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार,मंत्री केले तेच लोक आज खोके घेऊन सेनेशी गद्दारी केली
कोरोना काळात सण उत्सव करण्यास केंद्र सरकारने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घातली होती परंतु हे सरकार मध्ये आल्यानंतर सांगत सुटले कि आमच्या मुळे सण साजरा करता येऊ लागले;असले भावनिक राजकारण करत जनतेला भुलवतात.
पोलीस भरती प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. इतर कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया सुरू नाही बेरोजगार युवक आत्महत्या करत आहेत.
याकडे लक्ष नाही. विकासकामावर लक्ष नाही यांचे लक्ष फक्त सरकार मधून कोणी फुटू नाही म्हणून याकडे आहे. मंत्री मंडळ विस्तार त्यामुळेच करत नाहीत;पण यामुळे महाराष्ट्राचा नुकसान होत आहे. कांदा कापूस ऊस याचे भाव पडले आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी जगला पाहिजे म्हणून विलासराव देशमुख आणि मी तीनशे कोटींचा अतिरिक्त कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.शेतकऱ्यांना अद्याप अतिवृष्टीचे अनुदान देण्यात आले नाही. यावर हे सरकार तोंड लपवत आहे.
आपल्याकडे उसाला भाव नाही परदेशात साखर ४२०० आनि आपल्याकडे ३२०० भाव मिळतो.साखर निर्यातीला आम्ही अनुदान देत होतो. कारण शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल.
डबड्या एसटी बस वर जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च करतात;परंतु त्याच एसटी कामगाराचे पगार करण्यास पैसे नाही म्हणतात.अशी खरपूस टीका अजित पवार यांनी राज्यसरकार वर केली.
धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामरासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ सुरु करावे असे सुचवले आम्ही लगेच ते त्यांच्या नावाने ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन केले.भगवान गडाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिला.
परंतु यांचे लोकं फक्त महापुरुषांचे विषयी बेताल वक्तव्य करत आहेत.आमच्या काळात सुरु केलेल्या कामांना हे सरकार फक्त स्थगिती देत आहे. कसब्यात आम्ही जिंकलो तर हे सांगतात की आम्ही जोमाने काम करू ,आम्ही त्याच्या डबल जोमाने काम करू असे पवार म्हणाले,पिंपरी चिंचवड ची निवडणूक आम्ही थोडक्यात हरलो अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
भगवान गडासह ४६ गावे पाणीयोजनेला मंजुरी दिल्याबद्दल अजित पवार यांचा परिसराच्या वतीने सन्मान करण्यात आला.पाथर्डी शहरातून अजित पवार आ.लंके प्रतापकाका ढाकणे,यांची पाथर्डी शहरवासीयांनी भव्य मिरवणूक काढली.
