Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शेवटच्या माणसाच्या हिताची आ.नीलेश लंके यांच्याकडून जपवणूक – खा. शरद पवार

शेवटच्या माणसाच्या हिताची आ.नीलेश लंके यांच्याकडून जपवणूक – खा. शरद पवार

mahalokwaniBy mahalokwaniMarch 10, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

निघोज येथे आ. निलेश लंके यांचा वाढदिवस साजरा

निघोज : विशेष प्रतिनिधी

कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे भाजपावाले भाव पडल्यावर कांद्याकडे ढुुंकूनही पहायला तयार नसल्याची टीका करीत कांदा, ऊस तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निघोज येथे बोेलताना सांगितले. दरम्यान, तालुक्याच्या हितासाठी काही ना काही केले पाहिजे यासाठी सतत कार्यरत असलेल्या आ. नीलेश लंके यांनी सतत सामान्य माणसाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न केल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी यावेळी काढले.

आ. नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचा वाढदिवस, निघोज पतसंस्थेचे बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्था असे नामकरण, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे लोकार्पण, ४० बेरोजगारांना व्यवसायिक वाहनांचे वितरण, १०० गरीब कुटूंबांना घरकुलांचे वितरा तसेच ७ हजार गरीब विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना खा. पवार म्हणाले, आज सबंध देशातील शेती, शेती अर्थव्यवस्था संकटाच्या काळातून जात आहे. मी राज्याच्या काही भागात जाऊन आलो. महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे पिक आहे उसाचे टनेज कमी येत आहे. भावाचीही खात्री नाही. तिन दिवसांनी लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. दिल्लीला गेल्यानंतर कांदा, ऊस तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्‍न यांची मांडणी संसदेत, केंंद्रीय मंत्रीमंडळापुढे मांंडण्याची कामगिरी मी आणि माझ्या सहकाऱ्यांकडून केली जाईल. आज कांद्याचा यक्ष प्रश्‍न आहे. कांदा हे जिरायत शेतकऱ्यांचे पीक आहे. माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचे काम होते त्यावेळी आम्ही मोठया प्रमाणावर कांद्याची निर्यात केली. दिल्लीत कांद्याचे भाव चढले. संसदेत भाजपाचे खासदार कांद्याच्या माळा घालून निषेध करू लागले. मात्र शेतकरी वर्गाला कधीतरी दोन पैसे मिळाले तर माळा घालून निषेध करण्याचे नाटक कशासाठी असा प्रश्‍न आपण मांडला. कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे आज मात्र कांद्याचे दर पडले त्यावेळी त्याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नसल्याची टीका पवार यांनी केली


सर्व कामांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मेहनत करण्याची नीलेश लंके यांची तयारी असल्याचे सांगत पवार यावेळी बोलतना पुढे म्हणाले, लंके यांच्या या वृत्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव घेतले जाते. कोरोनाचे संकट आले. संपूर्ण देशातील लोक अस्वस्थ होते. पारनेरचे चित्र मात्र वेगळे होते. लंके यांनी सर्व रूग्णांची व्यवस्था केली. मदत केंद्र उभे केले. या काळात ते घरीही गेले नाहीत. अखंडपण रूग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा ही भूमिका घेउन त्यांनी काम केले.


यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, पोपटराव गावडे, राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरूण कडू, घनश्याम शेलार, वसंत कवाद, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, सुरेश बापडे, राहुल सागर, भैरवनाथ काळे, काकासाहेब कोयटे, अशोक सावंत, अर्जुन भालेकर, बाबाजी तरटे, प्रशांत गायकवाड, राणीताई लंके, ज्ञानदेव लंके, दिपक लंके, अ‍ॅड. राहूल झावरे, कारभारी पोटघन, अक्षय चेडे, राजेंद्र चौधरी, मधुकर उचाळे, डॉ. बाळासाहेब कावरे, विजय डोळ, सुदाम पवार, बापूसाहेब शिर्के, जीतेश सरडे, संजय लाकुडझोडे, खंडू भुकन, बा.ठ. झावरे, मच्छिंद्र लंके, भागुजी झावरे, दादा शिंदे, अशोक घुले, विक्रमसिंह कळमकर, शिवाजी लंके, विजय औटी, दौलत गांगड, अमृताशेठ रसाळ, सचिन गवारे, दत्ता लाळगे, बाळासाहेब लंके, संदीप सालके, कैलास गाडीलकर, अनिल गंधाक्ते, सचिन पठारे, पुनम मुंगसे, अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे, ठकाराम लंके, किसन रासकर, राहुल खामकर, सुनील वराळ, विठ्ठल कवाद, विश्‍वास शेटे, संदीप वामन वराळ, सुखदेव ढवळे, नवनाथ लाळगे, शांताराम लाळगे, सोमनाथ आहेर,प्रकाश गाजरे, पियूष गाजरे, भास्कर कवाद, दामुशेठ घोडे, अरूणाताई घोडे, अतुल लोखंडे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, गणेश औटी, डॉ. आबासाहेब खोडदे, नामदेवराव थोरात, सुशिलाताई ठुबे, चंद्रकांत लामखडे, प्रभाकर कवाद, गंगाराम बेलकर, शांताराम लंके आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleतेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचं ब्रेकअप; तेजस्वी म्हणाली, मी अंधश्रद्धाळू आहे म्हणून..
Next Article जामखेड येथील व्यापारी असोसिएशने घेतली केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.