जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
शनिवार दि.11.03.2023 रोजी कर्जत येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता, जामखेड शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने जामखेड मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अ.नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग मध्ये शहरातील दोन किलोमीटर अंतरा मध्ये डिव्हायडर एरिया व युटिलिटी एरिया हा कमी करावा याकरिता आज रोजी जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देताना जामखेड व्यापारी असोसिएशन चे शरद शिंगवी, आकाश बाफना, अशोक बाफना, कांतीलाल खिंवसरा आदी सर्व व्यापारी असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रश्नात लवकर लक्ष घालून सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन दिले.
