Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Heart attack| हार्ट अटॅक पासून स्वतःला वाचवा ..! नियमित चालण्याचा आपल्या शरीराला कसा होतो फायदा जाणून घ्या..

Heart attack| हार्ट अटॅक पासून स्वतःला वाचवा ..! नियमित चालण्याचा आपल्या शरीराला कसा होतो फायदा जाणून घ्या..

mahalokwaniBy mahalokwaniMarch 12, 2023Updated:March 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

चयापचय गतिमान करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे चालणे. ताशी ८ किमी किंवा त्याहून अधिक वेगाने चालल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे १० मिनिटांच्या चालण्याचाही शरीराला फायदा होतो. दररोज ६० मिनिटे चालण्याचे शरीराला वेगवेगळे फायदे होतात.

१० मिनिटे चालणे : साखर नियंत्रित होते

नियमित १० मिनिटांच्या चालण्यामुळे फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड ग्लुकोज सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर ते जास्त फायदेशीर आहे. टाइप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किमान ५००० पावले चालणे आवश्यक आहे. यामध्ये ३००० स्टेप्स ब्रिस्क वॉक म्हणजे गाणे गाता न येण्याएवढ्या वेगाने.

Advt

20 मि. चालणे : वृद्धत्व प्रक्रिया मंदावते

दिवसातून २० मिनिटे वेगवान चालण्यामुळे मायटोकॉडियाच्या कार्यामध्ये तीव्र सुधारणा होते. मायटोकांड्रिया शरीर आणि विविध अवयवांना ९०% ऊर्जा प्रदान करते. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेह या हृदयाला हानिकारक घटकांत सुधारणा होते.

30 मि. चालणे : प्रतिकारशक्ती वाढते

शरीराचे संरक्षण करणाऱ्या बी सेल्स, टी-सेल्स आणि किलर सेल्सची सक्रियता वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. चालताना आकुंचन आणि प्रसरण पावणारे स्नायू पायांमधील नसांवर दबाव टाकतात, त्यामुळे वेगवेगळ्या अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाहू लागतो.

४० मि. चालणे : तणाव कमी होतो

३ मैल प्रतितास या वेगाने ४० मिनिटे चालणे आपल्या शरीरातील तणाव संप्रेरक कार्टिसोलची पातळी कमी करतेच, पण मेलाटोनिनसारख्या स्लीप हार्मोन्सची पातळीदेखील वाढवते. यामुळे चांगली झोप येते. तणाव कमी होतो. याशिवाय स्नायूही मजबूत होतात.

५० मि. चालणे: वजन वेगाने घटते

४ मैल प्रतितास वेगाने चालल्यास ८० किलो वजनाची एखादी व्यक्ती ५० मिनिटांमध्ये सुमारे ३५०-४०० कॅलरीज बर्न करू शकते. आपण दररोज ५०० कॅलरीज जास्त जाळल्या आणि आहार नियंत्रणात ठेवला तर महिन्याभरात १.५ किलोपर्यंत वजन कमी करता येते.

६० मि. चालणे:

सरासरी आयुर्मान वाढते दररोज ६० मिनिटे चालण्याने मेंदू आणि मज्जातंतू दोन्ही शांत होऊन छोटे-छोटे विचार करण्याची क्षमता वाढते. हे व्यक्तीला रणनीतिकदृष्ट्या समृद्ध करते, त्यामुळे सर्जनशीलता वाढते. ६० मिस्टिांच्या चालण्याने शरीराच्या जवळजवळ सर्व भागांना फायदा होतो, त्यामुळे सरासरी आयुर्मान वाढते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री विखे पाटील यांची जामखेड येथील व्यापारी बांधवानी घेतली भेट..!
Next Article ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणा बरोबर सर्व सुविधा देऊ- खा.डाॅ.सुजय विखे पाटील
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.