Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आता कोरोनापेक्षाही घातक Camel Flu चं संकट! WHO चा इशारा; काय आहेत Camel Flu ची लक्षणं?

आता कोरोनापेक्षाही घातक Camel Flu चं संकट! WHO चा इशारा; काय आहेत Camel Flu ची लक्षणं?

mahalokwaniBy mahalokwaniDecember 19, 2022Updated:December 19, 2022No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दोन वर्षांनी कोरोनातून नुकताचं कुठं सुटकेचा श्वास मिळाला असतांना आता काही देशात एक व्हायरस पाय पसरू लागला आहे. कतारमध्ये सुरू झालेल्या फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी जगभरातून लाखो फुटबॉल चाहते गेले होते. अशातच कतारहून परतणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना डॉक्टरांनी कडक इशारा दिला. परतणारे चाहते हे उंटांमध्ये आढळणारा घातक ‘कॅमल फ्लू’ पसरवू शकतात असं त्यांनी म्हटल आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, कॅमल फ्लू’ हा रोग आहे तरी काय? त्याची लक्षणे काय आहेत? याच विषयी जाणून घेऊ.


कॅमल फ्लू म्हणजे काय?
कॅमल फ्लू हा एक प्रकारचा व्हायरस आहे. जो उंटांपासून मानवांमध्ये पसरतो. ज्या देशांमध्ये उंटांची संख्या जास्त आहे, त्या देशांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो. साधारणपणे, आखाती देशांमध्ये हा व्हायरस जास्त असतो. कारण तिथे उंटांचा वापर जास्त होतो. त्यामुळे आखाती देशात हा फ्लू पसरण्याचा धोका असल्यानं कॅमल फ्लूमुळे जगभरात दहशत निर्माण झाली. कोरोनाप्रमाणेच ‘कॅमल फ्लू’ हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहे. ‘कॅमल फ्लू’च्या संसर्गाचा त्रास वाढल्यास त्यामधून निमोनियाचा धोका संभावतो. म्हणजेच ‘कॅमल फ्लू’चा संसर्ग झालेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णाची श्वसन यंत्रणा काम करणं बंद करते. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरच्या सहाय्याने कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजनचा पुरठवा करावा लागतो.

▶ पाहिलं रुग्ण कधी आळला ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार मर्स व्हायरसचं, म्हणजेच ‘मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम व्हायरस’चं पहिलं प्रकरण २०१२ साली सौदी अरबमध्ये समोर आले होते. एप्रिल २०१२ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत मर्स-सीओव्हीच्या २ हजार ६०० प्रकरणांची नोंद झाली आहे. यामुळे ९३५ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोनासारखाच हा श्वासावाटे पसरणारा आजार आहे. तो मानवाद्वारे सुद्धा पसरतो.

▶ कॅमल फ्लूची लक्षणे काय आहेत?

कोरडा खोकला, घशात खबखव, न्युमोनिया होण्याचा धोका, पोटात जंत होणं, पोटाच्या समस्या उद्भवणं ही कॅमल फ्लूची लक्षणं आहेत. याशिवाय, कॅमल फ्लूमध्ये लोकांना दम लागणे, ताप, जुलाब अशा समस्यांनांही सामोरे जावे लागते. तर दुसरीकडे, वृद्ध, किडनीचे रुग्ण, कर्करोगाचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असू शकतो. सध्या, कतारमध्ये MERS ची २८ प्रकरणे नोंदली गेली आहेत. कतारमध्ये हा संसर्ग दर १० लाख लोकांमागे १.७ एवढा आहे.

▶ कॅमल फ्लूचा संसर्ग कसा होतो?

आजाराने ग्रस्त असलेल्या उंटांच्या संपर्कात आल्याने माणसांमध्ये हा व्हायरस पसरतो. अशा परिस्थितीत उंटाच्या जवळ जाऊन किंवा उंटाच्या दुधापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने लोकांमध्ये त्याचा प्रसार होतो. याशिवाय ‘कॅमल फ्लू’चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्कात आल्यास या विषाणूचा मानवाकडून मानवाला संसर्ग होतो. नेमक्या कोणत्या पद्धतीने या व्हायरसचा प्रसार होतो हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी कोरोना प्रमाणेच नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या अंशातून या आजाराचा प्रादुर्भाव होतो असं सांगितलं जाते.

▶ कॅमल फ्लू किती धोकायदाक?
‘कॅमल फ्लू’ हा कोरोनापेक्षाही धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार या विषाणूचा संसर्ग झालेल्या १०० लोकांपैकी ३५ जणांचा मृत्यू होतो.

▶ कॅमल फ्लूवर उपचार उपलब्ध आहेत का?
सध्या ‘कॅमल फ्लू’वर कोणतीही लस उपलब्ध नाही. तसेच कोणतेही ठराविक औषध या आजारासाठी उपलब्ध नाही. त्यामुळेच रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणं आणि इतर औषधांच्या आधारे या संसर्गावर उपचार केले जातात.

▶ बचाव कसा करायचा?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दैनंदिन स्वच्छता ठेवणे हा यावरील सर्वोत्तम बचावात्मक मार्ग आहे. याशिवाय लोकांना कच्चे मांस न खाण्याचा आणि स्वच्छता राखण्याचा सल्ला देण्यात आलाय. लोकांना प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर हात चांगले धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्राण्यापासून मिळणारे अन्नपदार्थ, द्रव्य सेवन करताना काळजी घेणंही महत्वाचं असल्याचं सांगितलं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleफुटबॉल विश्वकप अर्जेंटिना विश्वविजेता – मेस्सी तुस्सी ग्रेट
Next Article सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.