महालोकवाणी न्यूज:
पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी .मोरे वस्ती तालुका दौंड येथील आरोपी .निखिल साबळे याच्या विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल साबळे सोबत मयत प्रियेसीचे 5 वर्षापासून प्रेम संबंध होते पाच वर्ष झाले तरी निखिल माझ्या सोबत लग्न करत नाही आणी लग्नाला नकार देत आहे. .म्हणून मला जगण्याची इच्छा राहिली नाही असे तिने घरी नातेवाईकांना सांगितले.. रात्री उशिरा घरातील सगळे झोपी गेल्यावर तिने आत्महत्या केली.असे समजले.

फिर्यादी जबाब देतो की,मी वरील ठिकाणी माझे आई-छाया,भाउ-अजिंक्य,बहीन- साक्षी मोरोपंत गायकवाड वय.22 वर्षे असे एकत्रात राहण्यास असुन मी आर्मी बेस वर्क शाँप खडकी पुणे येथे अँप्रान्टीस करुन त्यावर कुंटुबाची उपजिविका करतो.

बहीन-साक्षी मोरोपंत गायकवाड ही आनंद हाँस्पीटल दौंड येथे डी.एम.एल.टी विभागात काम करीत होते.
काल दिनांक-11/03/2023 रोजी रात्रौ 9.30 वाचे सुमारास मी काम करुन घरी आलो त्यावेऴी माझा मावस भाउ-सौरभ सुर्यकांत गायकवाड याने सांगितले की,रात्रौ 8.20 वाचे सुमारास मी घरी असताना साक्षी ही मुलगा नामे-निखिल साबळे यांचेसोबत घरी आली होती.त्यावेऴी साक्षी हीने मी निखिल साबळे याचेसोबत लग्न करणार आहे असे सांगितले काहीवेऴाने तिचे सोबत आलेला मुलगा-निखिल साबळे हा घरी गेल्यानंतर मी साक्षी हीला घरी आणुन सोडविले आहे असे सांगितले.त्यानंतर बहीण -साक्षी ही घरी आल्यानंतर मी व माझी आई-छाया असे घरी असताना बहीन-साक्षी मला थोडी टेंन्शन मध्ये असल्यामुऴे मी तिला विचारले की,काय झाले त्यावर तिने सांगितले की,माझे निखिल साबऴे रा-मोरेवस्ती ता-दौंड जि-पुणे यांचेसोबत गेले 5 वर्षापासुन प्रेमसंबंध आहेत.मला त्याच्याशी लग्न करायचे आहे.पण तो माझ्या सोबत लग्न करण्यास नकार देत आहे.त्यामुऴे मी त्याला वारंवार माझ्या सोबत लग्न कर असे म्हणत आहे परंतु तो लग्न करण्यास तयार नाही असे सांगुन माझी जगण्याची इच्छा राहीली नाही.असे सांगितले त्यावेऴी मी तिची समजुत काढत सोबत जेवणकरुन रात्री 11.30वा.सुमारास झोपी गेलो.
त्यानंतर आज दिनांक-12/3/2023 रोजी सकाऴी 06.00 वाचे सुमारास मी झोपीत असताना मला दरवाजा लावल्याचा आवाज आल्याने मी झोपेतुन उठुन पाहीले त्यावेऴी घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता.घरामध्ये जावुन पाहीले असता बहीन -साक्षी ही घरामध्ये दिसली नाही.आई-घरात दिसली त्यावेऴी मी माझ्या शेजारी राहणारे सोहेल शेख यांना फोन करुन घराचा दरवाजा बाहेरुन उघडण्यास सांगितले.
त्याने दरवाजा उघडल्यानंतर मी टेरेसवर जावुन पाहीले मला बहीन-साक्षी ही दिसली नाही.त्यावेऴी मी टेरेसवरुन खाली पाहीले असता बहीन-साक्षी रक्त बंबाऴ अवस्थेत खाली पडलेली दिसली त्यावेऴी मी माझी आई-छाया हीस सांगुन आम्ही दोघांनी खाली जावुन पाहीले बहीन-साक्षी हीचा रक्तत्राव होत असल्याने तिस आम्ही औषधउपचारकामी आनंद हाँस्पीटल दौंड येथे घेवुन गेलो.डाँक्टरांनी औषधउपचारापुर्वी मयत झाल्याचे सांगितले आहे. पुढील तपास पो.स.ई.चवरे मँडम करत आहेत
