Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेला परवानगी देऊ नये; या संघटनेने दिलं पोलीस महासंचालकांना पत्र !

राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेला परवानगी देऊ नये; या संघटनेने दिलं पोलीस महासंचालकांना पत्र !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 13, 2023Updated:March 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आणि भाषण नेहमीच चर्चेचा विषय असतो. राज ठाकरेंचं भाषण मनसे कार्यकर्ते राज्यभरातून सभास्थळी जमा होतात. मात्र राज ठाकरे यांच्या सभेवर आणि भाषणावर बंदी घालावी अशी मागणी भीम आर्मीने महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहून केली आहे.

राज ठाकरे दरवेळी आपल्या भाषणातून दलित, मुस्लीम आणि संविधान विरोधी भूमिका घेत असतात. ते आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना असंविधानिक कृत्य करण्यास सांगतात. त्यामुळेच गुडीपाडवानिमित्त राज ठाकरे यांची शिवाजी पार्कात होणाऱ्या सभेला परवानगी देऊ नये. जर परवानगी दिली असेल तर ती तत्काळ रद्द करावी., असं पत्र भीम आर्मीने पोलीस महासंचालकांना दिलं आहे. 

भीम आर्मीने पत्रात काय म्हटलंय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे हे आपल्या पत्रकार परिषदेत, आपल्या भाषणात प्रत्येक वेळी दलित, मुस्लिम आणि संविधान विरोधी भूमिका घेत असतात. ते नेहमी आपल्या भाषणातून त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना असंविधानिक कृत्य करायला सांगतात हे देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण मानवतेसाठी घातक आहे.

इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक होत आहे. तसेच दादर रेल्वे स्टेशनला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी देशभरात आंदोलन सुरु आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराला ही राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

भारतीय संविधानानुसार देशात सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. परंतु राज ठाकरे यांच्या असंविधानिक, धार्मिक आणि जातीवादी भाषणामुळे नेहमी हिंदू-मुस्लिम समाजात दंगली घडवण्याचे काम, प्रयत्न केला गेला आहे.

त्यामुळे आपण आमच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन गुडीपाडवा निमित्त 22/03/2022 तारखेला राज ठाकरे यांची शिवाजी पार्क मैदान दादर पश्चिम येथे सभा आहे. या सभेस आपण परवानगी देऊ नये आणि जर परवानगी दिली असेल तर ती तत्काळ रद्द करावी.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जतमध्ये महिला दिन उत्साहात साजरा, सौ. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते; कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान बचत गटांना कर्जवाटप, आरोग्य तपासणी
Next Article कर्जत- कोपर्डी | NDRF च्या टीमला सागर बरेला हाती लागला परंतु; तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.