Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मढीत कानिफनाथांचा जयघोष; दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी!

मढीत कानिफनाथांचा जयघोष; दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 14, 2023Updated:March 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:

श्री क्षेत्र मढी,ता पाथर्डी येथे देश भरातून आलेल्या लाखो भाविकांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे कानिफनाथ महाराज की जय’ असा जयघोष करत दर्शन घेतले. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेली श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांचा संजीवन समाधी दिवस व रंगपंचमी सणाच्या दिवशी राज्यासह शेजारील राज्यातील भाविकांचा गर्दीचा महापुर लोटला होता. यावेळी लाखो भाविकांनी कानिफनाथांचे दर्शन घेतले. कानिफनाथ महाराज की जय असा जयजयकार करत, रेवड्याची उधळन, पारंपारिक ढोल ताशा, शंख, व डफाच्या आवाजाने संपूर्ण मढी परिसर दुमदुमला होता.

होळी, रंगपंचमी व फुलोरबाग, अशा तीन टप्प्यांत मढी येथील यात्रा भरते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने मढी यात्रेचा हा मुख्य दिवस असतो. मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्यामुळे भाविकांना कानिफनाथांच्या समाधीचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र यावर्षी पहाटपासूनच मढीकडे जाणारे सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. यावेळी सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावर्षी देवस्थान समितीने दर्शनासाठी एकेरी बारी केल्याने मुख्य मंदिरात भाविकांची गैरसोय टळली. ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली होती. नाथांचा प्रसाद म्हणून भाविक रेवड्या नाथांच्या समाधीला वाहत होते. त्यामुळे रेवड्यांच्या बाजारात मोठी उलाढाल झालेली पाहायला मिळाली.

भरला गाढवांचा बाजार

मढी येथील गाढवांचा बाजार राज्यात प्रसिद्ध असून, या बाजारात काठेवाडी व गुजरात येथील गाढवांना मोठी मागणी असते. मात्र आज प्रथमच या बाजारात पंजाब चे गाढवं दाखल झाली होती. त्यांना मागणीही मोठ्या प्रमाणात होती. एका गाढवाला सुमारे एक लाख रुपयांचा भाव मिळाला. काठेवाडी व गावरान गाढवांनाही चांगली मागणी होती.

सर्वत्रच वाहतुक कोंडी –

जिल्ह्यातील सर्वच आगारांतून यात्रोत्सव निमित्ताने मढीला जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या.या बसची तसेच खाजगी वाहनांची मढी ते निवडुंगे व मढी ते तिसगाव मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजुनी पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी आक्रमक; जामखेड तालुक्यामधील कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालये ओस !
Next Article जामखेड | युवा नेते जमीर सय्यद यांचा भाजपा मध्ये प्रवेश
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.