Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे व्यक्तिमत्व विशेष लोकप्रिय आहे. डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचं मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आ.प्रा. राम शिंदे यांची दमदार कामगिरी; कर्जत -जामखेड मतदारसंघासाठी 26 कोटींचा भरीव निधी आणला खेचून !
त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यात डख यांच्या नावाचं वादळ गेल्या काही वर्षात पाहावयास मिळत आहे. राज्यात कदाचित असा एखादाच शेतकरी असेल ज्याला पंजाबराव हे नाव माहिती नाही.

पण नुकतीच सोशल मीडियामध्ये पंजाबराव डख आणि नाशिकच्या एका शेतकऱ्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या ही कॉल रेकॉर्डिंग वेगाने व्हायरल होत आहे.
संप करणाऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याची तरतूद; विधानसभेत ‘मेस्मा कायदा’ चर्चेविनाच बहुमताने मंजूर !
यामध्ये परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये डख काही कंपन्यांकडून भरमसाठ पैसे घेतात असा आरोप लगावण्यात आला आहे. यामुळे सध्या या रेकॉर्डिंगची मोठी चर्चा आहे.
