जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड पोलीस स्टेशन येथे आज रोजी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत विविध सण तसेच महापुरूषांची जयंती साजरी करताना काही अडचणी येऊ नये तसेच उपाययोजना कराव्यात.

या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी ,कर्जत जामखेड विधान सभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले,मौलाना खलील, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, नगराध्यक्ष निखिल घायतडक, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद,भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, उपाध्यक्ष सनि सदाफुले,मंगेश आजबे,काँग्रेसचे राहुल उगले , वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अतिश पारवे,शिवप्रतिष्ठाणचे तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले,मुख्तार सय्यद,नगरसेवक दिगंबर चव्हाण, शामीर सय्यद ,भिमटोला ग्रुप चे संस्थापक बापुसाहेब गायकवाड,कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक सागर सदाफुले, प्रा लक्ष्मण ढेपे ,संभाजी ब्रिगेड चे कुंडल राळेभात,प्रा.विकी घायतडक, हरिभाऊ बेलेकर,विनायक राऊत, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले,बाबा सोनवणे,आप्पा ढगे,नितीन जगताप,योगेश सदाफुले, तुषार शिरोळे, गणेश घायतडक, किशोर कांबळे , राजन समिंदर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले सर्व जयंती पुण्यतिथी या मिरवणुकीसाठी सर्वांनी मांडलेल्या समस्या बरोबर आहे परंतु महावीर जयंती ही शांततामय वातावरणात असते आणि सकाळी आठ वाजता जैन स्थानकातून निघून जय हिंद चौक ते जुन्या पोलीस स्टेशन समोरून नऊ वाजेपर्यंत जैन स्थानकात पोहोच होणार आहे तसेच महावीर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या जीआर प्रमाणे मटन चिकन,मच्छी दुकाने बंद ठेवावीत असे सांगितले.
यावेळी मधुकर राळेभात म्हणाले सध्या कोणतीही जयंती नुसते हिंदू म्हणून चालणार नाही सर्व समाज मिळून आपण जयंती साजरी करण्यात यावी.
यावेळी अजय काशिद म्हणाले आम्ही रामनवमी मिरवणूक सर्व धर्म मिळून काढणार आहोत आपण सर्वांनी हजर राहावे तसेच महिलांसाठी फिरते शौचालयाची सोय जामखेड नगर परिषदेने करावी.
यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले शांतता कमिटीच्या मिटींगसाठी मी पहिल्यांदाच आलो परंतु दोन्ही साहेब नवीन आहेत आणि शांतता कमिटी मध्ये झालेली विषय खरोखर चांगल्या प्रकारचे घेतले त्याबद्दल मी साहेबांचे अभिनंदन करतो आणि शांततामय वातावरणात सर्व मिरवणूक पार पाडावे.
यावेळी बोलताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणाले राम नवमी महावीर जयंती ,रमजान ईद ,महात्मा फुले जयंती ,आंबेडकर जयंती ,राज्याभिषेक अशा सर्व जयंतीच्या कार्यक्रम या महिन्यात येत आहेत त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मिरवणूक काढताना मिरवणूक चांगल्या प्रकाशित प्रकारे कशी होईल असे करा जिरवणूक होणार नाही असं करू नका मी आणि पोलीस निरीक्षक साहेब दोघे नवीन आहोत बऱ्याच काही माहिती नाहीत आपण सर्वांनी सहकार्य केले तर कुठेही गालबोट लागणार नाही आतापर्यंत दोन जयंती माझ्या उपस्थितीमध्ये मिरवणूक झाल्या कुठेच अडचण आली नाही तसेच पोलीस सांग कडे यंत्रणा असते तसे आम्ही आमच्याकडे यंत्रणा नाही सध्या प्रशासक असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत असतात कसलाही खर्च प्रशासना प्रशासकाच्या हिशोबात झाला तर नगर परिषद चे मुख्याधिकारी आल्यानंतर हिशोब देताना फार त्रास होतो कोणताही बोर्ड परवानगी घेऊन लावला तरी पुण्यतिथी जयंती झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ज्या त्या संघटनांनी काढून घ्यावेत अन्यथा ज्या लोकांनी परवानगी घेतली नाही त्यांचे बॅनर आम्ही स्वतः करणार आहोत यात कोणीही राग मानू नये राहिला प्रश्न गावामध्ये मिरवणूक ज्यावेळेस होईल त्यावेळेस काही मुस्लिम बांधवांनी लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो असे म्हणाले आहेत दुसरा भाग म्हणजे मी पण जामखेड चा नागरिक आहे मी सुद्धा पाण्याची व्यवस्था करणार आहे माझ्या स्वखर्चाने तसेच जामखेड चे काही उद्योजक आहेत त्यांना पण आपण अशा काही व्यवस्था असतील तर करण्यास सांगू
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले, आमच्या पोलीस स्टेशनला कमी स्टाफ असल्यामुळे आम्ही एवढ्या ठिकाणी पुरवू शकत नाहीत तरी आमच्या विनंतीनुसार तुमच्या प्रत्येक संस्थेने स्वयंसेवक ठेवा म्हणजे आम्हाला मदत होईल हजार लोकांमध्ये एक दोन लोक खराब असतात चाललेल्या कार्यक्रमात उगीच दगडफेक किंवा काहीतरी चुकीचे करून बाकीच्यांना प्रोत्साहन देत असतात त्याच्यावर आमची करडी नजर राहणार आहे मी स्वखर्चाने दोन सी.सी.टी.व्ही. बसवणार आहे प्रत्येक मिरवणुकीचा प्रत्येक क्षणाचा व्हिडिओ आमच्याकडे राहणार आहे त्याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मिरवणुकीच्या वेळी मस्जिद पासून डीजे बँड बंद करावे तसेच एखाद्या मंदिरात कीर्तन चालू असेल तर तिथे सुद्धा दिसते होणार नाही याची जबाबदारी घ्यावी महत्त्वाचे म्हणजे डीजे ला मुंबई पुण्यामध्ये परवानगी नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकांना डीजे शिवाय कोणता कार्यक्रम पूर्ण होत नाही त्यामुळे कमी आवाजात डीजे लावून आपले कार्यक्रम पार पाडावेत, मी डीजेचे रीडिंग घेणार आहे आवाज वाढवला तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला आहे डीजे मुळे हॉस्पिटल मधील रुग्णांना खूप त्रास होतो किंवा ६५ते ७० च्या पुढील वयोवृद्ध लोकांना खूप त्रास होतो त्यासाठी डी.जे. न लावता महिलांचे पथक बोलवा असे ते म्हणाले
नुकत्याच परीक्षा झाल्या यासाठी आमचा पोलीस स्टाफ कमी पडत होता होमगार्डच्या मदतीने आम्ही आत्ताच्या परीक्षा पार पाडू शकलो काही ठिकाणी लग्नाच्या वेळी रोड कसा जाम होईल असे काही लोक असतात त्यासाठी तुमचे स्वयंसेवक आणि आमचा काय असतात तर मदत होऊ शकते
महावीर जयंती निमित्त जैन समाजाची मिरवणूक शांततामय असते परंतु शासनाच्या जी.आर. नुसार मुस्लिम बांधवांनी आणि मच्छी मटन विक्रेत्यांनी ४ एप्रिल रोजी आपले दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे
कोणत्याही वाढदिवसाचा अथवा कार्यक्रमाचा डिजिटल बोर्ड चौकाचौकात लावला जातो तो एकच दिवस लावण्यात यावा अन्यथा परवानगी न घेता कोणी लावला तर तो आम्ही काढून त्याच्यावर एफ आय आर दाखल करणार तसेच कोणत्याही समाजाचे झेंडे अथवा पताका लावलेल्या असतील तर त्याने त्याच्या दुसऱ्या दिवशी स्वतःहून काढून घ्याव्यात अन्यथा आम्हाला काढावे लागतील यासाठी आयोजकांनी आम्हाला सहकार्य करावे.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले अग्निशामक आणि पाण्याचे दोन एक्स्ट्रा टँकर भरून ठेवावेत तसेच दोन ॲम्बुलन्स यावेळी रेडी ठेवाव्यात एक कोठारी प्रतिष्ठान यांची ॲम्बुलन्स राहील आणि दुसरी 108 उपस्थित राहील.
शांतता कमिटीच्या बैठकीसाठी विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित राहिल्या बद्दल पोलीस नाईक अविनाश ढेरे यांनी आभार मानले.
1)मिरवणूक ही दिलेल्या वेळेत तसेच दिलेल्या मार्गप्रमाणे व कायदेशीर नियमात पार पाडावी. 2)वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
3)वाहतूक नियमन करिता आपले स्तरावर स्वयंसेवक नेमावे.
4)वादग्रस्त गाणी किंवा वादग्रस्त विधान कोणी करणार नाही व त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
5)मिरवणूक मार्गावरील मुस्लिम धार्मिकांचे प्रार्थनास्थळ ( मस्जिद ) या ठिकाणी मिरवणूक आल्यावर सदर ठिकाणावरून मिरवणूक पुढे न्यावी व नमाज च्या वेळेस कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवणार नाही. याची दक्षता घ्यावी.
6)नगरपरिषद यांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून घ्यावेत तसेच मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची सोय करावी.
7)mseb जामखेड यांनी मिरवणूक मार्गावरील खाली आलेल्या विद्युत तारा ओढून घ्याव्यात.तसेच मिरवणूक चालू असताना लाईट जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
8)महिलांसाठी मिरवणूक मार्गावर किंवा कार्यक्रम ठिकाणी फिरते शौचालय व्यवस्था करावी.
याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
