सातारा जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 318 ग्रामपंचायती पैकी 199 ग्रामपंचायतीवर शिंदे फडणवीस सरकारने सत्ता काबीज करून सातारा जिल्ह्यातील पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला धोबीपछाड दिला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने एकूण 98 जागांवर सत्ता काबीज केली आहे. तर स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून 28 ग्रामपंचायतीवर तटस्थ उमेदवार हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता शिंदे फडणवीस सरकारची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 318 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने 101 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे तर भाजपने 98 ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने 78 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात यश मिळवले राष्ट्रीय काँग्रेसला अवघ्या सात ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झालेले देखील दिसून आले ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील सातारा जिल्ह्यामध्ये आपले खाते उघडत त्यांनी 7 ग्रामपंचायतीवर काबीज मिळवला आहे .
सातारा जिल्ह्यातील स्थानिक आघाड्यांनी या राष्ट्रीय पक्षांना बाजूला ठेवत गावपातळीवर आघाड्या करत एकूण 28 ग्रामपंचायतीवर समविचारी पॅनलचे उमेदवार निवडून आणून त्यांनी या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील एकूण 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये सातारा जावली चे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात आणि राष्ट्रवादीच्या गटामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक 29 ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विजयी संपादन केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती फक्त एकच ग्रामपंचायत लागल्याने सातारा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पीछेहाट झालेल्याचे देखील दिसून आले.
