जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
दि.१४ एप्रिल रोजी तपनेश्वर रोड नाथ नगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अँड. डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी अँड डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. व पुढे म्हणाले. की छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. तेच स्वातंत्र टिकून राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शिकवण दिली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.
रक्ताचा एक ही थेंब न सांडता मोठी क्रांति घडवून आणली. आपण ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालावे. व सर्वांना भीम जयंतीचा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर किशोर राठोड, सम्राट घोडेस्वार, पवार सर यांची मनोगते झाली. यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, प्रिन्स (भाऊ) सदाफुले, रवी (भाऊ) सोनवणे, लखन मिसाळ, सुधीर कदम, बाबासाहेब काळे, उत्तम पवार, श्रीकांत कदम, सागर चव्हाण, आकाश शेगर, अतुल ढोणे, राजू शिंदे, बाबासाहेब शिंदे व सर्व भीमसैनिक उपस्थित होते. या जयंतीचे नियोजन व सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी केले.
