जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त जामखेड शहरातील मिलींदनगर परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता जामखेड चे तहसिलदार योगेश चंद्रे, यांच्या शुभ हस्ते पंचशील ध्वज फडकवण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील, नगर परिषद चे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध वंदना घेऊन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच लेझिम पथकातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सन्मानित करण्यात आले.लेझिम पथकातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी प्रात्याक्षिक दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा. मधुकर राळेभात ,वंचित बहुजन आघाडी चे नेते अँड डाँ अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब गायकवाड, काँगेसचे राहुल उगले मनसे नेते हवा सरनोबत, तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, उपाध्यक्ष सनि सदाफुले,नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक गुलशन अंधारे, नगरसेवक दिगांबर चव्हाण,बाबासाहेब मगर, प्रताप पवार सर,बापूसाहेब ओव्हळ,बौध्दाचार्य अशोक आव्हाड, मुकुंद घायतडक, बलजी जावळे,छबू ओव्हळ, किशोर सदाफुले, प्राचार्य विकी घायतडक, वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अतिष पारवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे सर, समीर चंदन, प्राचार्य निलेश गायकवाड,बाळासाहेब घायतडक ,प्रभाकर सदाफुले,नामदेव गंगावणे,रामदास भालेराव,रंगनाथ सुपेकर,मयुर भोसले सर,सचिन गाडे,विक्रांत घायतडक,अमोल गिरमे,लखन मिसाळ,डाँ. महेश मासाळ, गौरव घायतडक आदी भिमसैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर व माहिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच मिलींद नगर येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.डीजेच्या तालावर भिमसैनिक पावसाचे मनमुरात आनंद घेत नाचत होते. तसेच या महामानवाला सलामी दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश सदाफुले, तुषार शिरोळे,दादा मोरे, पप्पुराज सदाफूले, गणेश घायतडक,दत्ता जगताप, अंकल घायतडक,नयन गायकवाड, विशाल समिंदर,रवि कांबळे,बाला साठे, आकाश दारा, बाळु भालेराव , शिवम घायतडक , संतोष सदाफुले ,लक्ष्मण सदाफुले, दिनेश ओव्हळ, उबेद शेख, स्वप्नील शिरोळे, सुमित सदाफुले, आदींनी परिश्रम घेतले.

🔳 मिलिंदनगरचा परत एकदा भिमाचा किल्ला मजबूत
जामखेड तालुक्यातील मिलिंदनगर हे आंबेडकर चळवळीचे माहेरघर परंतु मध्यंतरी कोरोनामुळे गेले पाच वर्ष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती छोटेखाणी साजरी केली जायची. परंतु मिलिंद नगर मधील सर्व तरुणांना आपआपसातील गट तट विसरुन एकत्र करुन भिमटोला यंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड यांनी सर्व तळागाळातली लहान मोठ्यांना विविध धर्मातील लोकांना एकत्र आणुन परत एकदा भिमाचा किल्ला मजबूत केला.

जामखेड शहरामध्ये सार्वजनिक भिमजयंती उत्सव समिति व समस्त भिमसैनिक यांच्या वतीने मिलींद शिंदे
व साऊ प्रतिष्ठाण आयोजित आनंद शिंदे यांच्या भिमगितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दोन्ही कार्यक्रम यशस्वी करणे मिलिंदनगर जयंती महोत्सव समितीवर मोठे आव्हान होते. परंतु मिलिंदनगरच्या सर्व कार्यकर्त्याच्या अथक प्रयत्नाने भव्य – दिव्य मिरवणूकीचे आयोजन केले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या माध्यमातून लक्ष वेदुन घेताना दिसत होते. पांढऱ्याशुभ्र साड्या, डोक्यावर फेटे, वयोवृद्ध, तरुण, भिमसैनिकांची तुफान गर्दी ही मिलिंद नगरची एकजुट भिमजयंतीच्या माध्यमातून मिलिंदनगरने परत एकदा भिमाचा किल्ला मजबूत केल्याचे चित्र पहायला मिळाले.

आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या जामखेड शहरातील मिलिंदनगर जंयती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षीची आंबेडकर जयंतीनिमित्त जामखेड शहरामध्ये भव्य दिव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
भिमटोला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतुन व मिलिंदनगर जयंती महोत्सव समितीचे सदस्य यामध्ये योगेश सदाफुले, अतिष पारवे, सनी सदाफुले, गणेश घायतडक, दादा मोरे, तुषार शिरोळे, पप्पु सदाफुले, अंकल घायतडक, संतोष सदाफुले यांच्या विशेष प्रयत्नाने जामखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूकीत बाबासाहेबांच्या घोषणांसह घुमला जय भिमचा नारा यामध्ये लहान मुलांचे लेझिम पथक, हलगी पथक, सनई तुतारी, ढोलीबाजा, डिजे साऊंड सिस्टीम अशा विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.
