जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
जामखेड शहरामध्ये प्रथमच व्हेटरीनरी डायग्नोस्टीक लॅबचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जामखेड पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड व आंबी ता. भूम चे पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार देशमुख होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डॉ. झेंडे होते,कार्यक्रमास प्रमुख मान्यवर पशुवैद्यकीय संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विठ्ठल राळेभात हे होते. तसेच पशुवैद्यक क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक डॉ. धारकर, डॉ. आटोळे, डॉ. मंडलीकर, श्री. पाचारणे तसेच डॉ. आबा बोराटे, डॉ. अनभूले, डॉ. घायतडक, डॉ. उबाळे, डॉ. भोरे, डॉ.मोरे, डॉ. विशाल बोराटे, डॉ. शिंदे, डॉ. लगस डॉ. जगताप, डॉ. डफाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

डेल्टा व्हेटरनरी डायग्नोस्टीक लॅबच्या माध्यमातून जामखेड व शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पशुधन आरोग्यविषयक रक्त, लघवी, दूध, गोचीड ताप व इतर तपासण्या केल्या जातील सर्व शेतकन्यांनी याचा लाभ घ्यावा. लॅबचे संचालक डॉ. नेटके पी. ए. यांनी सर्वांचे आभार मानले.