जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
मागील काही दिवसांपासून (Pune Traffic) पुणे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राहण्यासाठी योग्य आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आता वाहतूक कोंडीत जगात 6 व्या क्रमांकावर आल्यानं पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत. येत्या काही दिवसांत पुण्यात वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. टॉम टॉम कंपनीनं वाहतूक कोंडीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारतातील तीन शहरांत सर्वाधिक ट्रॅफिक असल्याचं समोर आलं आहे. बंगळुरू जगात दुसऱ्याया क्रमांकावर, पुणे सहाव्या तर दिल्ली सतराव्या क्रमांकावर आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, त्यासोबतच वाहतूकीची कोंडीची समस्याही पाहायला मिळत आहे. अनेक पुणेकर वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत.
