Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सिल्लोड येथे होणार “राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे” आयोजन

सिल्लोड येथे होणार “राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे” आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniDecember 22, 2022Updated:December 22, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सिल्लोड येथे होणार राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
निवृत्ती महाराज इंदोरीकर,अजय – अतुल, अभिनेता प्रसाद ओक सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लावणार हजेरी

शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानावर सिल्लोड महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याअनुषंगाने येथे व्यासपीठ व मंडप उभारणीच्या कामाला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमीपूजन करून या कामाला सुरुवात करण्यात आले आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून येत्या 1 जानेवारी पासून सिल्लोड येथे ‘ राज्यस्तरीय सिल्लोड महोत्सव 2023 ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
सिल्लोड महोत्सव अंतर्गत नगर परिषद प्रशालेच्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार व गायक, अजय – अतुल, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते आदी कलाकार याच मैदानावर आपले सादरीकरण करणार असून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन या ठिकाणी होणार आहे. यासह चला हवा येऊ द्या, फु बाई फु, महाराष्ट्राची हास्य जत्रा तसेच चांद कादरी व छोटी तमन्ना यांच्या कव्वालीचा मुकाबला आणि मुशयरा या ठिकाणी पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, माधुरी पवार, मानसी नाईक यांच्यासह कॉमेडीयन सुनील ग्रोवर, जावेद अली हे कलाकार उपस्थित राहणार आहेत.
आतापर्यंतच्या इतिहासात इतका भव्य स्वरूपाचा महोत्सव पहिल्यांदा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अवाहन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, स्वराजचे संचालक प्रमोद सरकटे, स्वराज सरकटे, जि.प. माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, न.प.तील गटनेते नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, हाजी फेरोज तांबोळी, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, राजू गौर, डॉ. दत्तात्रय भवर, माजी जि.प. सदस्य गोपी जाधव आदींची उपस्थिती होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleएटीएम, क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये नेमका फरक काय? कोणत्या कार्ड्सचा वापर कुठं होतो?
Next Article सोने 55 हजार तर चांदी 69 हजार रुपयांच्या वर
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.