पुणे जिल्ह्यातील( pune )मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांची काल दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. तळेगाव अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. या घटनेने फक्त तळेगावच नाही तर संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. या हत्येच्या निषेधार्थ तळेगाव परिसरात व्यापाऱ्यांनी उत्सफुर्त बंद पुकारला होता. या घटनेला काही तासही उलटत नाही तोच या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. किशोर आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.👇