अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:-
जामखेड येथील रत्नद्दीप मेडिकल कॉलेज मध्ये अध्यक्षांनी केलेल्या कृत्याच्या निषर्धात आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी अहमदनगर जिल्हा कार्यालयाबाहेर दलित महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या माध्यमातून मा. संजय जाधव यांच्या मार्फत आमरण उपोषणला सुरवात झाली आहे,

पहा व्हिडिओ👇
एकीकडे देशाच्या राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलन चालू असताना आता राज्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली आहे. जामखेड शहरातील एका नामांकित संस्थेच्या अध्यक्षांनी यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदवला आहे.
पहा व्हिडिओ👇
सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत.
पहा व्हिडिओ👇
जामखेडमध्ये घडलेल्या या विकृत कृत्याविरुद्ध जामखेड प्रशासन तसेच राजकारणी अजूनही शांत आहे. या प्रकरणी काही पत्रकारमित्र सुद्धा सदरील व्यक्तीला पाठीशी घालत आहे. मात्र आता महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीने दिलेल्या निवेदनामुळे जामखेडकर अश्या कृत्याचा विरोध करतील का ? तसेच पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन काय कारवाई करतंय ? अश्या विकृतीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार काय पाऊल उचलतेय हेच पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
जाधव यांच्या प्रमुख मागण्या

जो पर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही आणि या नराधामचा दि 24 मे 2023 रोजी श्रीगोंदा कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी आहे या नाराधामला जामीन मिळाला तर याची हिम्मत अधिक वाढेल आणि यापुढेही तो असे कृत्य करेल त्यामुळे याचा जामीन अर्ज बाद करण्यात यावी व आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .तसेच सरकारने पिढीतीची बाजू गंभीरपणे मांडावी अशी मागणी करण्यात आली.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराhttps://fb.watch/kGYc32T7b4/?mibextid=Nif5oz