सध्या महाराष्र्टात गौतमी पाटील Gautami Patil हिने आपल्या नृत्याने सर्वांनां भुरळ घातलेली आपणास पाहायला मिळत आहे. पण गौतमीच्या मागची पिढा काही सुटेना , कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्या नावाची बदनामी सर्रास चालू आहे ,

माघील काळात गौतमी पाटीलच्या Gautami Patil अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ, गौतमी पाटील उदयनराजेंची भेट, एका मागोमाग एक घडणाऱ्या या घटना व त्या नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या टीकांमुळे गौतमी सदैव चर्चेत राहिली.

गौतमीच्या बॉयफ्रेंडचे नाव ते तिच्या मानधनाचा आकडा प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच गौतमीच्या लग्नाच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. आता याच गौतमीचे नाव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे आणि ते म्हणजे गौतमीचे आडनाव! ज्या सबसे कातील गौतमी पाटील या नाऱ्याने प्रसिद्ध झालेल्या गौतमीचे आडनाव मुळात पाटील नाहीच अशी चर्चा करण्यासाठी पुण्यात अलीकडेच चक्क एक बैठक सुद्धा पार पडली होती.

मराठा समन्वयक अशी ओळख सांगणाऱ्या राजेंद्र जराड पाटील व काही अन्य पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या मुलाखतीत गौतमीला पाटील आडनाव लावण्याबाबत थेट इशारा दिला आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील Gautami Patil हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

गौतमी पाटीलही Gautami Patil आपल्या निर्णयावर ठाम आहे , लोक माझ्या कलेला मानतात आडनावाला नाही, त्यामुळे मला काही फरक पडत नाही माझे कार्यक्रम व्यवस्थित चालू आहेत. व सर्व कार्यक्रमांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे , ज्याला काय बोलायचे त्यांना बोलू द्या मी माझी कला अखंड चालू ठेवणार आहे.
गौतमी पाटीलाच Gautami Patil का लक्ष केले जाते हे कारण अजून तरी समजलेले नाही, का फक्त गौतमी पाटीलच असे नृत्य करते का, बाकी डान्स बार , या ठिकाणी कसे डान्स चालतात हे दिसत नसतील का . हे खूप सारे प्रश्न आहेत ,