आष्टी ( प्रतिनिधी–गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील सरकारी रस्ते, पाटबंधारे विभागाचे कालवा रस्ते, सर्विस रोड, अतिक्रमित झाले असून सदरील..रस्ते खुले करणे बाबर जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी सांगितले आहे की, आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरकारी रस्ते, तसेच पाटबंधारे विभागाने तयार केलेले कालवे,त्यांच्या शेजारचे रस्ते, सर्विस रोड,पाणंद रस्ते, शिवरस्ते, हे रस्ते धनदांडगे शेतकऱ्यांकडून अतिक्रमित झालेले असून.. गरीब शेतकऱ्यांना हे रस्ते बंद झाल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत

आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलवडगाव, दादेगाव, कडा, पिंपळा, खडकत, आष्टी, ब्रह्मगाव, पाटसरा, डोईठाण, पांढरी, डोंगरगण, हरिनारायण आष्टा, या ठिकाणी अनेक रस्ते भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशावर दिसत आहेत. परंतु अतिक्रमणामुळे बंद झालेले आहेत.
तसेच सार्व.बांधकाम विभाग, अंतर्गत सरकारी मालकीचे रस्ते देखील तालुक्यातील भू माफीयांनी गिळंकृत केलेले आहेत आणि सदरील रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे.. सदरील पूर्वापार असलेले.. रस्ते नष्ट केल्यामुळे शेतकरी व नागरिक यांनी अनेक तक्रारी तहसील कार्याकडे केलेल्या आहेत परंतु अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही अनेक गावी सरकारी रस्त्यांवर फळबागा, शेत तलाव, स्वतःच्या मालकीच्या सिंचन विहिरी तसेच नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत बंद करून बदलून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

या ठिकाणी रस्त्याची आढळून झाल्यामुळे शेतकऱ्यांनी इतर ठिकाणाहून रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशा मागण्या वाढलेल्या आहेत त्यामुळे अनेक गावी वादविवाद उद्भवल्याच्याही घटना घडलेल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्याचे ही दिसून आलेले आहे त्यामुळे
वरील प्रमाणे रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची कारवाई करण्याबाबत तहसीलदार तहसील कार्यालय आष्टी यांना आदेश व्हावेत अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आ
