Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरसेवक सुनिल त्र्यंबके करणार प्रभाग दोनचा कायापालट ; दहा हजार वृक्षारोपणाचा संकल्प.!

नगरसेवक सुनिल त्र्यंबके करणार प्रभाग दोनचा कायापालट ; दहा हजार वृक्षारोपणाचा संकल्प.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 7, 2023Updated:June 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर – तहान लागल्यावर विहिर खोदण्यापेक्षा अगोदरच पाण्याची सोय करावी म्हणजे भविष्यात अडचणी येणार नाही. त्याप्रमाणे उद्याच्या सावलीकरीता आज झाडे लावावी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, भावीपिढी निरोगी राहण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र.2 मध्ये नगर फौंडेशन आणि गिरीकर्णिका ग्लोबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 100 झाडांचे वृक्षारोपण पूर्ण करण्यात आला. येणाऱ्या काळात वार्डात दहा हजार वृक्ष लागवड करणार आहे यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे, वनरक्षक राजश्री राऊत, फौंडेशनचे रविंद्र गोरे, गिरीकर्णिका ग्लोबल फौंडेशनचे जगदीश शिंदे, राजेंद्र खेडकर, धनंजय मोकासे, सचिन कडूस, आशिर्वाद चव्हाण, सतीश वाळके, सोपान तोडमल, प्रकाश पालवे, गोरक्षनाथ आव्हाड, अमोल गांगर्डे, सखाराम नाईकवाडे, अभिषेक खामकर, सुमन आव्हाड, आकाश त्र्यंबके, कमल आव्हाड, काकडे, निमसे, तिमलेश पासकंट्टी आदिंसह वृक्षमित्र उपस्थित होते.

श्री.त्र्यंबके पुढे म्हणाले, कोरोनाने ऑक्सिजनचे महत्व काय आहे हे सर्वांना दाखवून दिले. त्यासाठी वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे. हे कर्तव्य या निमित्ताने आम्ही पार पाडत आहोत.

मा. नगरसेवक निखिल वारे यांनी सांगितले की, वृक्षारोपणाबरोबरच प्रदुषण मुक्तीसाठी स्वत:हून पुढे या. प्रभाग दोन हा प्लॅस्टिक मुक्त कसा होईल, याबाबत जनजागृती करण्यात येईल. पर्यावरणासाठी प्लॅस्टिक बंदी महत्वाची असल्याचे सांगितले

नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी यावेळी बोलतांना म्हटले कि, लोकांना सावली पाहिजे , फळे , फुले पाहिजे पण त्या झाडाचा पडलेला चालत नाहीत, ज्यांना हा झाडाचा कचरा चालत नाहीत ते उच्च शिक्षित असतात , त्यांच्याकडून या अपेक्षा नसतात, त्यामुळे अशा लोकांनी या कारणारवरून विरोध करणे उचित ठरत नाही

शेवटी आयोजक योगेश पिंपळे यांनी सर्वांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी होईल, आज वड, पिंपळ, आंबा, निलगिरी वृक्षांचे रोपण करण्यात आले. ज्या-ज्या ठिकाणी ही झाडे लावली तिथे राहणारे नागरिक स्वत:हून त्या झाडांचे संगोपन करणार आहेत. फौंडेशनच्या सहकार्यामुळे 100 झाडे रोपण करण्याचा संकल्प पूर्ण झाल्याबद्दल आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआष्टी तालुक्यातील चक्क नकाशावरील रस्तेच गायब; जिल्हाधिकारी मॅडम आपण जातीने लक्ष घाला – रवी काका ढोबळे
Next Article पारनेर न्यायाधीश उमा बोराडे यांची बदली; अनेकांना कायद्याच्या चौकटीत राहून मदतीची भूमिका वकील संघातर्फे सत्कार.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.