ज्या राजाच्या दरबारात स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेली. आज त्याच राजाच्या राज्यात महिलांवरील अत्याचार सर्रासपणे वाढत आहे. तरीही सरकार आणि प्रशासन मूग गिळून बसलय. इतर वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व डोक्यावर घेऊन नाचणारे शिवभक्त आज शिवरायांची शिकवण विसरलेत असच म्हणावं लागेल. लोकशाहीचा चौथा मानला जाणाऱ्या पत्रकारितेला तर काही पत्रकारांनी काळिमा फासलीय. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांनी आपली लेखणीच गहाण ठेवलीय, एवढी मोठी घटना घडून सुद्धा हे गप्प बसले आहेत.

जामखेड येथिल रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर संस्थेच्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेणाऱ्या पिडीत विद्यार्थ्यीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी भास्कर मोरेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळला असून अटकेच्या भितीने मोरे फरार झाला आहे. आता पोलीस प्रशासनाने मोरेला अटक करण्यासाठी पोलीस पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले आहेत, कोणत्याही क्षणी पोलीस मोरेला अटक करतील.

या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा विनयभंग केल्या प्रकरणी संस्था चालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनंतर मोरेच्या काॅलेजवर वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशपुर्व प्रवेशासाठीची स्पर्धा परिक्षेचे कारण दाखवत श्रीगोंदा सत्र न्यायालयापुढे तात्पुरत्या जामीन साठी अर्ज दाखल केला व त्यास तात्पुरता जामीन मिळालाही. यामुळे काही काळ का होईना पण जामखेड पोलीसांबाबत या प्रकरणी जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला होता. मात्र यानंतर जामखेड पोलीसांनी केलेल्या जबाब, पंचनामे तसेच आवश्यक योग्य कार्यवाहीमुळे भास्कर मोरेचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला असून मोरे फरार झाला आहे

उच्च न्यालायत असा झाला युक्तिवाद:
मोरेच्या वतीने असे म्हणणे मांडण्यात आले आले की, हा गुन्हा बाजार समितीच्या निवडणुकी मुळे दाखल झाला असा दावा भास्कर मोरे तर्फे करण्यात आला. परंतु जामखेडच्या कोणत्याही नेत्याने या प्रकरणात भास्कर मोरेला अटक करा म्हणूंन भूमिका घेतली नाही त्यामुळे हे म्हणणे कोर्टाने मोडीत काढले
उच्च न्यायालय म्हणणे
कॉलेज विश्वस्त व प्राचार्य हे विद्यार्थ्यांचे पालक असतात विशेष करून मुलींचे परंतु तेच भक्षक झाले असे निरीक्षण नोंदवले आहे . इतर मुलीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोपीला अटक करून तपास करावा असा आदेश कोर्टाने दिला आहे.
श्रीगोंदा येथील न्यायालयात आरोपीच्या वतीने हा गुन्हा सात वर्षाच्या शिक्षेच्या कमी आहे त्यामुळे आम्हाला जामीन मिळावा अशी विनंती केली होती पण न्यायालयाने पण यावर ताशेरे ओढत सदर गुन्हा जरी कमी शिक्षेचा असला तरी आरोपीस अटक करून आतापर्यंत झालेल्या घटनांचा सविस्तर तपास करावा यासाठी श्रीगोंदा कोर्टानेही मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता
उच्च न्यायालयात दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर
झालेल्या सुनावणीत दहा गंभीर मुद्दयावर दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र मोरेच्या वतीने मांडण्यात आलेले मुद्दे फेटाळत सरकारी पक्षाची बाजू योग्य असल्याचे न्यायालयाने मान्य केले. व त्या अधारे भास्कर मोरेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्यानुसार आता मोरेला अटक करण्याची मोठी जबाबदारी जामखेड पोलीसांवर आली आहे. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व या गुन्हाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती यांच्याशी संपर्क केला असता भास्कर मोरेला अटक करण्यासाठी जामखेड पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच मोरेवर आणखी कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य तो तपास करत
या संपूर्ण प्रकरणावर संभाजी ब्रिगेड पक्षाची अधिकृत भूमिका
विद्यार्थिनी विनय भंग प्रकरणी भास्कर मोरेचा अटक पूर्व जामीन मा. उच्च न्यायालयाने फेटाळला आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. उच्च न्यायालयात जामखेड पोलिसांनी भक्कम बाजू मांडली त्या बद्दल जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांचे अभिनंदन. लवकरात लवकर त्याला अटक करावी ही अपेक्षा आहे.
मात्र या गंभीर प्रकरणावर मा. आमदार रोहित पवार व मा. आमदार राम शिंदे गप्प का बसले आहेत. तुमच्या मतदार संघात महिला मुली सुरक्षित नाहीत हे उघड्या डोळ्यांनी कसे पहवते. सर्वसामान्य जनता फक्त मतदान करायलाच हवी आहे काय? नराधम भास्कर मोरे राष्ट्रवादी काँग्रेस चा पदाधिकारी आहे म्हणून महिला आयोग गप्प बसला आहे काय ? मा. रुपाली ताई चकणकर गप्प का आहेत.
चित्रा ताई वाघ यांना येथील मुलींवर झालेला अन्याय दिसत नाही का? मा. गोपीचंद पडळकराना अहिल्यादेवी होळकरांच्या जन्म भूमीत अहील्येच्या लेकी सुरक्षित नाहीत हे दिसत नाही का ? या वर मा. राम शिंदे, मा. रोहित पवार, मा. गोपीचंद पडळकर विधानसभेत व विधान परिषदेत आवाज उठवून मुलींना न्याय देणार आहेत का हा प्रश्न आहे. भास्कर मोरेच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक जाचातून सर्व मुला मुलींची सुटका करण्यासाठी संभाजी ब्रिगेड शेवट पर्यंत लढत राहणार आहे!
