Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गर्दी; मिळतोय जास्त भाव, रोख पैसे, कमी कपात.!

कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गर्दी; मिळतोय जास्त भाव, रोख पैसे, कमी कपात.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी कांदा भाव नाही. आवक कमी झाली असताना दुसरीकडे मात्र खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला चांगला भाव आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदे विक्रीसाठी शेतकरी येऊ लागले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यातून तो शेतकरी सावरतो ना सावरतो तेवढ्यात सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दर नाहीत. सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळत आहेत.

खासगी बाजार समितीत कांदा आवक जास्त
खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती 300 रुपयापासून 1100 रुपयापर्यंत कांदा दर दिला जात आहे. सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत साधारण दोन ते अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक होते आहे. दुसरीकडे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत याच कांद्याची आवक दहा ते बारा हजार क्विंटल होत आहे.

खासगीत लागत नाही तोलाई, मोजाई, हमाली सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी नेतात. त्यानंतर तोलाई, मोजाई , हमाली, गोणीचे दर यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळला आहे. खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र कुठल्याही पद्धतीने तोलाई, मोजाई, हमाली हे लागत नाही.

खासगी बाजार समितीत कांदा विक्री गोणीचे पैसे देखील लागत नाही. रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती आपला कांदा विक्री करू लागला आहे. शेतकऱ्यांनी कांदा विकल्यानंतर ताबडतोब रोख रक्कम मिळते. मात्र तसे सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत होत नाही. त्या ठिकाणी पंधरा दिवसांचा चेक किंवा ऑनलाईन पेमेंट दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना थांबावे लागते. हे परवडत नसल्याने अनेक शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपला कांदा विक्री करू लागले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMHT-CET 2023 परिक्षेत श्री सांदिपणी अँकॅडमी चे दैदिप्यमान यश
Next Article Maruti Suzuki मारूती सुझुकीची सात सीटर कार लवकरच बाजारात; जाणून घ्या किंमत.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.