Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड मध्ये भिमसैनिकांच्या वतीने विराट हल्लाबोल मोर्चा; अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी.!

जामखेड मध्ये भिमसैनिकांच्या वतीने विराट हल्लाबोल मोर्चा; अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 17, 2023Updated:June 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

बोंढार ता.जि.नांदेड येथे बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव याची गावात भिमजयंती साजरी केली म्हणून गावातील जातीयवादी गावागुंडानी निर्घृण हत्या केली…या घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटत आज जामखेड शहरात याचे पडसाद उमटले समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

मोर्चाची सुरुवात खर्डा चौक ते तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात येऊन मोर्चाचे सभेत रुपांतर झाले मोर्चात भिमसैनिक मोठ्या संख्येने हातात निळे ध्वज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन सहभागी झाले होते.

अक्षय भालेराव खून प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबास भेट देत त्यांना न्याय मिळवून द्यावा, कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करावी, कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, या प्रकरणात सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केली.

सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले म्हणाले की,फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली जाते,ही निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो.आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालावा.तसेच दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत तात्काळ द्यावी.


मयत अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे व पीडित कुटुंबाला शासनाने पन्नास लाख आर्थिक मदत देण्याची मागणी मोर्चेकरांनी केली. यावेळी अनिल सदाफुले, बाळासाहेब शिंदे, बापुसाहेब ओव्हळ, बापुसाहेब गायकवाड,उमरभाई कुरेशी, विनोद शिरसाट,मल्हारी सदाफुले,प्रा.राहुल आहिरे, राजन समिंदर,अजिनाथ शिंदे यांची भाषण झाले, तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.


यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,
सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक, बापुसाहेब गायकवाड,राजन समिंदर,
अनिल सदाफुले,दादासाहेब घायतडक, बापूसाहेब ओव्हळ, सनी सदाफुले,अतिश पारवे,प्रा.राहुल आहिरे,राजेंद्र सदाफुले,रजनीकांत मेघडंबर,सचिन सदाफुले,बाबा सोनवणे, जुबेर शेख,विनोद शिरसाट,डाॅ.सचिन घायतडक,संदेश घायतडक,किशोर सदाफुले,शेखर घायतडक,दिपक घायतडक,किशोर काबंळे,सुर्यकांत सदाफुले,दिनेश घायतडक,संभाजी आव्हाड,सुकेंद्र सदाफुले,राजू घायतडक,अँड.कृष्णा शिरोळे,मंगेश घोडेस्वार,विक्रांत अब्दुले,सोमनाथ आढाव,सनी प्रिन्स सदाफुले,राकेश घायतडक,सोनू सदाफुले,मनोज डाडर,संतोष थोरात,मिलिंद भोसले,सुमित काबंळे,महीला सुरेखा सदाफुले,अरुणा सदाफुले,मालन घायतडक,कुसुम साळवे आदी शेकडो भिमसैनिक उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार रोहित पवार यांनी पूर्ण केली निवारा बालगृहातील मुलांची इच्छा; दिली ही खास भेट वस्तू.!
Next Article अहमदनगर जिल्ह्यात बनसोडस् क्लासेस ठरत आहे NEET/JEE/MHT-CET च्या तयारीसाठी सर्वोत्कृष्ट.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.