महालोकवाणी न्यूज करीत आहे पाठपुरावा
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
मौजे स्वामी चिंचोली (शरदनगर) तालुका दौंड येथे दिनांक 26/ 12/2022 रोजी. सकाळीपासून अवैद्य मुरुम उत्खनन जोरातत सुरू आहे या बोगस उत्खननाबाबत माननीय तहसीलदार दौंड यांचा कसलाही आदेश नाही अथवा परवानगी नाही दिनांक 26 रोजी फार मोठ्या प्रमाणात
दहा ते बारा टायर हायवा गाड्या दिवसभर उत्खनन . केलेला बोगस मुरूम वाहतूक करत होत्या .याबाबत जयंत भोसले तलाठी यांना विचारले असता बघतो करतो अशी उत्तरे दिली मंडल अधिकारी नेवसे यांना विचारले असता संबंधित ठेकेदाराने चलन भरले असून आदेश अजून झालेले नाही असे सांगितले
ग्रामसेवक कांबळे यांना विचारले आसता ते म्हणाले उद्या दिनांक २७ रोजी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना योग्य त्या कारवाई साठी रिपोर्टिंग केले जाईल . याची स्वामी चिंचोली गावात खमंग चर्चा रंगली असून आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था झाली आहे असच म्हणावे लागेल.. संबंधित मुरूम चोरावरती कारवाई होते का नाही अशी खमंग चर्चा गावात चालू आह
