जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड येथे दि. २४ मे रोजी झालेल्या एका विद्यालयातील अल्पवयीन मुलींवर शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ जामखेड ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक २३ जून रोजी जामखेड पोलिस स्टेशन व जामखेड तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे शुक्रवारी जामखेडमध्ये पडसाद उमटले.

या घटनेचा निषेध नोंदवत शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमरभाई कुरेशी, नगरसेवक दिगांबर चव्हाण, अमित जाधव, प्राचार्य विकी घायतडक सर, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले आदींची भाषणे झाली.
या बाबत घटनेची माहिती अशी की,जामखेड येथे दि. २४ मे २०२३ रोजी झालेल्या जामखेड येथील एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर एका नराधम शिक्षकाने काळिमा फासणारे कृत्य केले आहे, शिक्षक नामे राधे उर्फ राधाकिसन जगन्नाथ मुरुमकर रा.साकत येथे राहणाऱ्या शिक्षकाने शाळेच्या माध्यमातून व अभ्यासाच्या माध्यमातून सोशल मिडिया द्वारे अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न फोटो मागवून ब्लॅकमेल करून मौजे आष्टी हद्दीतील हर्षद हॉटेल येथे घेवून जावून बळजबरीने अत्याचार केला व सदर प्रकार कोणास सांगितले तर जीवे मारू अशी धमकी दिली. म्हणून जामखेड पोलीस स्टेशन ला फिर्याद दाखल केली आहे.
सदर प्रकार अतिशय निंदनीय असून तसेच ज्या ठिकाणी हा प्रकार घडला म्हणजे हॉटेल हर्षद अथवा हॉटेल हर्षदचे मालक यांनी ज्या अल्पवयीन मुलीचे कोणतेही आधार कार्ड अथवा कोणतेही वयाचा प्रमाणपत्र न घेता आरोपीशी संगनमत करून रूम देवून गुन्हा केलेला आहे. त्यास देखील गुन्ह्यात सह आरोपी ह्या गुन्ह्यात करण्यात यावे व त्याच्या लाॅजिंग चे लायसन्स रद्द करण्यात यावे. व पुन्हा या प्रकारचे गुन्हे होणार नाही व शिक्षक यांची पूर्व चौकशी व चरित्र पडताळणी केल्या शिवाय नोकरीस ठेवू नये.
तसेच व या प्रकारचा गुन्हा परत घडणार नाही, तसेच कोणतेही लेकीस व विद्यार्थीनीस बळी पडू नये करिता आम्ही सर्व जामखेड ग्रामस्थ या नराधमास जास्तीत जास्त शासन व्हावे व शिक्षा व्हावी तसेच हाॅटेल हर्षद यांचे लॉज परवाना रद्द करण्याचे मागणी करत असून तसेच अथवा हॉटेल हर्षदचे मालक यांना गुन्ह्यात सह आरोपी करण्यात यावे असे या निवेदनाद्वारे आम्ही समस्त ग्रामस्थ निवेदन देवून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करत आहेत.अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ऊमरभाई कुरेशी, प्रा.कैलास माने,जमीर सय्यद, वसीमभाई (बिल्डर) कुरेशी, नगरसेवक
दिगांबर चव्हाण,अमित जाधव,कॅप्टन लक्ष्मण भोरे,नय्युम सुभेदार बापुसाहेब गायकवाड,प्रा.विकी घायतडक ,नासीर सय्यद,विकी सदाफुले, मुस्तफा (मेजर) शेख, कुंडल राळेभात,जुबेर शेख, अर्शद शेख,बाशदशेख,आबेद शेख,आदिल शेख,आबेज कुरेशी,अबुजर कुरेशी,वसीम सय्यद,सद्दाम तांबोळी,सिझान सय्यद,तौसिफ पठाण, अब्दुल खान,मजहर खान,फैज शेख,अतिक सय्यद,इकबाल शेख,आशपाक सय्यद,अरबाज शेख, शाहबाझ खान, अरबाज मनियार, शोएब खान,अकिब शेख,वसिम पठाण,साहिल शेख,अल्फाज कुरेशी, सुल्तान कुरेशी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
